जम्मू-काश्मीर : बारामुल्ला जिल्ह्यात एका दहशतवाद्याचा खात्मा

jammu and kashmir one terrorist killed
jammu and kashmir one terrorist killed

श्रीनगर : पुढारी ऑनलाईन : बारामुल्ला जिल्ह्यातील वानीगम बाला क्षेत्रात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यास पोलिस आणि सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. अद्यापही या ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे.

दुसऱ्या दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू आहे. कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्याची ओळख सध्या पटलेली नाही. परंतु, हे दहशतवादी स्थानिक असल्याचे म्हटले जात आहे. सुरक्षा दलाकडून अधिकृतरित्या एक दहशतवादी ठार झाल्याच्या वृत्ताला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही. या भागात दोन दहशतवादी लपल्याची माहिती समोर येत आहे. या चकमकीत लष्कराचे दोन आणि एक पोलिस जखमी झाल्याचीही माहिती समोर येतेय. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news