WhatsApp : आता व्हॉट्सवर करा एकाचवेळी ३२ जणांना व्हिडिओ कॉल

WhatsApp
WhatsApp

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हॉट्सअॅपने आपल्या नवीन कॉल लिंक्स या फीचरची घोषणा केली आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही एक लिंक जनरेट करू शकता. ती तुम्ही पुढे पाठवून कोणत्याही व्यक्तींशी संवाद साधू शकता. व्हॉट्सअॅपच्या या फीचरची लोक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. तसेच व्हॉट्स अॅप इतर अनेक फीचर्सवरही काम करत आहे.(WhatsApp)

या फीचरच्या मदतीने व्हॉट्स अॅप गुगल मीट आणि मायक्रोसॉफ्ट टीम्स सारख्या प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करण्यास सक्षम बनेल. यूजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी कंपनी सतत व्हॉट्स अॅपमध्ये सतत सुधारणा करत असते. सोमवारी, अॅपने एक नवीन वैशिष्ट्य जाहीर केले आहे, ज्याची लोक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. या फीचरचे नाव कॉल लिंक्स असे आहे . (WhatsApp)

काय आहे नवीन वैशिष्ट्य ?

कॉल लिंक्सच्या मदतीने व्हॉट्सअॅप वापरकर्ते चालू असलेल्या कॉलमध्ये इतर व्यक्तींना जोडू शकतात किंवा नवीन कॉल सुरू करू शकतात. कॉल लिंक्स हे फिचर अॅपच्या कॉलिंग टॅपमधून वापरता येणार आहे. वापरकर्ते ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलसाठी कॉल लिंकचा वापर करू शकतात.

आणखी वैशिष्ट्य लवकरच येणार येत आहे

अॅप व्हिडिओ कॉलवर लवकरच 32 लोकांना जोडले जाऊ शकते. कंपनी या फीचरची चाचणी सुरू करणार आहे. मार्क झुकरबर्गने सोशल मीडिया पोस्टमध्ये माहिती दिली की व्हॉट्सअॅपवर कॉल लिंक फीचर रिलीज होणार आहे. याच्या मदतीने युजर्स कॉलची लिंक त्यांच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसह शेअर करू शकतील. या लिंकवर क्लिक करून, वापरकर्ते सहजपणे कॉलशी कनेक्ट होतील. हे वैशिष्ट्य Google Meet किंवा Microsoft Teams प्रमाणेच काम करेल.

कॉल लिंक्स कसे तयार करावे?

तथापि, हे वैशिष्ट्य Android, iOS आणि Windows कोणत्या ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करेल हे मेटाने स्पष्ट केलेले नाही. कॉल लिंक तयार करण्यासाठी, वापरकर्त्यांना कॉल टॅबमधील कॉल लिंक्स तयार करा पर्यायावर क्लिक करावे लागेल. येथून वापरकर्ते ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलसाठी लिंक तयार करू शकतात.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news