Gold Rate : सोने-चांदीच्या दरात माेठी घसरण; पाहा किती आहे दर | पुढारी

Gold Rate : सोने-चांदीच्या दरात माेठी घसरण; पाहा किती आहे दर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. जागतिक बाजारात डॉलर किंमती स्‍थिर होताच त्‍याचा परिणाम रुपयांवर झाला. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून 24 कॅरेट सोन्याचा दर 49,368 प्रति 10 ग्रॅम असा असून एक किलो चांदीचा दर 54,193 रुपये प्रति किलो, 19,519 दर घसरला आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX ) सोन्याचा दर 49,368 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तर दुपारी 239 रुपये म्‍हणजेच 0.48 टक्कांनी खाली आला. तसेच चांदीचा 54,193 रुपये होता तो 799 म्‍हणचेच 1.44 टक्कांनी घसरला.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पॉट गोल्ड एप्रिल 2020 नंतरच्या सर्वांत नीचांकी स्तरावर गेल्यानंतर, 0634 GMT येथे 0.5 टक्क्यांनी घसरून 1,620.88 झाला आहे. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.4 टक्क्यांनी घसरून 1,629.70 वर आले आहे.

ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) माहितीनुसार, सोने चांदी दि. 28 सप्टेंबर रोजी 49,368 रुपये प्रति 10 ग्रॅम वरून 161 रुपयांनी खाली आले. तर चांदी 54,193 रुपये प्रति किलो वरून 19,519 घसरली.

हेही वाचा

व्हॉटसअप, Zoom कॉलसाठी KYC – विधेयकात तरतुद – KYC norms for messaging apps  

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता दिवाळीनंतर सुनावणी 

MPSC Exam TimeTable : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक केले जाहीर

Back to top button