Pune Ganeshotsav 2023 : गणेशभक्तांसाठी खुशखबर! आता एका क्लिकवर मंडळे, पार्किंग, बंद रस्त्यांची माहिती

Pune Ganeshotsav 2023 : गणेशभक्तांसाठी खुशखबर! आता एका क्लिकवर मंडळे, पार्किंग, बंद रस्त्यांची माहिती
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वैभवशाली परंपरा असलेला गणेशोत्सव पाहण्यासाठी शहरात येणार्‍या गणेशभक्तांना मंडळांची, पार्किंगची, रस्त्यांची अचूक माहिती पुणे पोलिस वाहतूक शाखेतर्फे एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याला 'सारथी गणेश उत्सव गाईड 2023' असे नाव देण्यात आले असून, लिंकचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी माजी खासदार अमर साबळे, आमदार माधुरी मिसाळ, सिध्दार्थ शिरोळे, माजी आमदार जगदीश मुळीक, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उप आयुक्त विजयकुमार मगर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते. ऐतिहासिक आणि परंपरागत उत्सवात अधिकाधिक नागरिकांना व पर्यटकांना सहभागी होता यावे, या उद्देशाने अ‍ॅपची निर्मिती केली आहे. या गाईडच्या माध्यमातून शहराचे मध्यवर्ती भागातील मुख्य गणेश मंडळे, वाहनतळ, यांचा मार्ग पाहता येणार आहे.

वाहनतळ : एकूण 5 शाळा, 7 कॉलेज यांचे मैदान संध्याकाळी सहा ते पहाटे 4 वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत. तसेच, पार्किंगसाठी पुणे मनपाकडील, इतर खासगी वाहनतळ, नदीपात्र इ. ठिकाणांची माहितीही लोकेशननुसार उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  • उत्सव काळातील बंद रस्ते व त्यांचे पर्यायी मार्ग यांचे कोणते, याची माहिती येथे मिळणार आहे.
  • गणेश उत्सव काळातील शहरातील रिंगरोडची माहिती या मॅपवर देण्यात आली आहे.
  • शहरातील मध्यवर्ती भागातील अवजड वाहतुकीसाठी बंदी असलेले मार्ग यांची माहिती देण्यात आली.
  • गणेशमूर्ती विसर्जन घाटांची माहिती लोकेशनसह मिळणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news