गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात भाजप सोडणार ६ रेल्वे, नितेश राणेंनी दिली महत्त्वाची माहिती

 नितेश राणे
नितेश राणे

पुढारी ऑनलाईन डेस्क : गणेशोत्सव कोकणातील सर्वात मोठा सण होय. प्रत्येक वर्षी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या प्रचंड असते. या काळात चाकरमान्यांसाठी रेल्वेची विशेष सोय असते. आता भाजपनेदेखील चाकरमान्यांसाठी विशेष ६ रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दलची माहिती भाजपा आमदार नितेश राणे यांनी एक्स (ट्विटर) वरून दिलीय.

संबंधित बातम्या –

औरंग्याच्या मांडीवर बसलेले उबाठाचे सरकार गेले

महायुतीचे सरकार आले हिंदु सणांवरचे संकट टळले
…..साथ भाजपाची, करू श्री गणेवारी कोकणाची!

असे ट्विट करत नितेश राणे यांनी एक फोटो पोस्टर ट्विट केले आहे. या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दिसतो आहे. त्याखाली नमो एक्सप्रेस असे टॅग असलेली रेल्वेचा फोटो दिसतो. या फोटोवर श्री गणेशवारी कोकणची साथ भाजपची अशी टॅगलाईन लिहिलेली दिसते. गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात भाजप सोडणार ६ ट्रेन.

या रेल्वेचा प्रारंभ देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते दादर रेल्वे स्थानक याठिकाणी रात्री पावणे दहा वाजता होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news