Parineeti-Raghav : राघव चड्ढा-परिणीतीचे वेडिंग कार्ड व्हायरल

राघव चड्ढा-परिणीती चोप्रा
राघव चड्ढा-परिणीती चोप्रा

पुढारी ऑनलाईन डेस्क : राघव चड्ढा-परिणीती चोप्रा यांनी खास वेडिंग डेस्टिनेशन निवडलं आहे. प्रसिद्ध असे उदयपूरमधील द लीला पॅलेसची त्यांनी निवड केलीय. त्यानंतर जी रिसेप्शन पार्टी होईल, त्यासाठी द ताज लेक लोकेशन निवडण्यात आले आहे. (Parineeti-Raghav) आजपासून ११ व्या दिवशी दोघे विवाहबंधनात अडकतील. हे कपल २४ सप्टेंबर रोजी लग्नबंधनात अडकतील. पण, अद्याप या गोष्टीची अधिकृत पुष्टी झालेली नाही. परिणीती – राघव यांची लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या वेडिंग कार्डमध्ये अगदी लहानातील लहान माहिती देण्यात आलीय. सोबतच वेळदेखील देण्यात आलीय. (Parineeti-Raghav)

संबंधित बातम्या –

परिणीती चोप्राची चुडा सेरेमनी

२३ सप्टेंबर रोजी महाराजा सुईटमध्ये हा सोहळा होणार आहे. एक खोली आहे जी परिणीतीने स्वतःसाठी बुक केली आहे. येथे अभिनेत्री लग्नासाठी तयार होईल आणि तिच्या चुडा समारंभासाठी पाहुणे खोलीतच येतील. त्याची थीम थीम Adorn with Love अशी ठेवण्यात आली आहे.

२३ सप्टेंबर – परिणीती चुडा सेरेमनी – महाराजा सुईट – सकाळी १० वाजता

एकाच दिवसात तीन समारंभ

परिणीतीने A Fresco Afternoon ठेवलं आहे, हा कार्यक्रम टेरेसवर होईल. याची थीम Blooms & Bites आहे. हा कार्यक्रम दुपारी १ वाजेपर्यंत चालेल. इनर कोर्टयार्डमध्ये १२-४ वाजेपर्यंत वेलकम लंच होईल. या कार्यक्रमात सर्व पाहुणे येतील. सायंकाळी ७ वाजता पार्टी होईल. ज्याची थीम 90's Edition, Let's party like it 90's अशी ठेवण्यात आली होती. हा कार्यक्रम Guava Garden मध्ये होईल.

२३ सप्टेंबर – A Fresco Afternoon- १० ते १ वाजेपर्यंत 

२३ सप्टेंबर – वेलकम लंच- Grains of Love- १२ ते ४ वाजेपर्यंत 

२३ सप्टेंबर – 90's Edition, Let's party like it 90's- सायंकाळी ७ वाजल्यापासून 

२४ सप्टेंबर – विवाह

परिणीती-राघवच्या विवाहाच्या फंक्शनची सुरुवात दुपारी १ वाजल्यापासून होईल. ज्यामध्ये राघवची सेहराबंदी होईल. यासाठी Threads of Blessings थीम ठेवण्यात आली असून हा कार्यक्रम ताज लेक पॅलेसमध्ये होईल. मग २ वाजता वरात असेल. त्याची थीम The Royal Procession असेल. लीला पॅलेसमध्ये परिणीती- राघव सात फेरे घेतील. याची थीम A Pearl White Indian Wedding ठेवण्यात आली आहे.

दुपारी साडे तीन वाजता जयमाला, दुपारी ४ वाजता फेरे आणि सायंका‍ळी ६ वाजता विदाई असेल. शेवटी लीला पॅलेसमध्ये रिसेप्शन पार्टी असेल. रात्री साडे ८ वाजता ही सुरू होईल. याची थीम आहे A night of Amore.

राघव सेहराबंदी- Threads of Blessings- ताज लेक पॅलेस दुपारी १ वाजता

वरात- The Royal Procession- दुपारी २ वाजता

परिणीतीचे मंडपमध्ये एन्ट्री टाईम – A Pearl White Indian Wedding- लीला पॅलेस दुपारी ३ वाजता

जयमाला- ३.३० वाजता

फेरे- ४ वाजता

विदाई- सायंकाळी साडे ६ वाजता

रिसेप्शन पार्टी- A night of Amore- लीला पॅलेस कोर्टयार्ड रात्री साडे ८ वाजता

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news