निज्जर हत्या प्रकरण : पंतप्रधान ट्रुडोंच्या आरोपामुळे कॅनडातील हिंदूंना देश सोडण्‍याची धमकी

India and Canada issue
India and Canada issue

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून ( Nijjar killing row ) भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव वाढला आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्‍या संसदेत हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमागे भारत सरकारचा कट असू शकतो, असा आरोप केला आहे. त्‍याच्‍या या आरोपामुळे आता दहशवादी गुरपतवंत पन्नून याने हिंदूंनी तत्‍काळ कॅनडा सोडावा, अशी धमकी दिली आहे. या धमकीमुळे हिंदूंमध्‍ये दहशत पसरली आहे.

संबंधित बातम्‍या :

भारताने दहशतवादी म्‍हणून घोषित केलेल्‍या गुरपतवंत पन्नून याने हिंदूंना धमकावणारा व्हिडिओ जारी केला आहे. त्‍याने म्‍हटले आहे की, भारतातील हिंदूंनी कॅनडा सोडून, भारतात जावे. ते केवळ भारताचे समर्थन करत नाहीत तर खलिस्तान समर्थक शिखांचे अभिव्यक्ती दडपण्याचे समर्थन करत आहेत. दहशतवादी संघटना शिख फॉर जस्टिसने म्हटले आहे की, कॅनडातील ट्रूडो सरकारने घेतलेल्‍या निर्णयामुळे आम्‍ही समाधानी आहोत. ( Nijjar killing row )

हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येमागे भारत सरकारचा कट असू शकतो, असा आरोप ट्रुडो यांनी केला होता. भारत सरकारनेही पलटवार करत सर्व आरोप निराधार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. कॅनेडियन हिंदू फॉर हार्मनी या संस्‍थेचे प्रवक्ते विजय जैन यांनी पन्नून याने दिलेल्‍या धमकीवर चिंता व्यक्त केली. त्‍यांनी म्‍हटले आहे की, "आम्ही कॅनडामध्‍ये हिंदूफोबिया पाहत आहोत. ट्रूडो यांनी भारतावर केलेल्‍या आरोपामुळे देशात हिंसा भडकू शकते. १९८५ च्या घटनेप्रमाणे कॅनडातील हिंदूंनाही लक्ष्य केले जाऊ शकते याची आम्हा सर्वांना भीती वाटत आहे, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

Nijjar killing row : १९८५ मध्‍ये कॅनडात काय घडलं होतं?

१९८५ मध्‍ये कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. २५ जून १९८५ रोजी मॉन्ट्रियलहून लंडनला जाणारे विमानाचा अटलांटिक महासागरावर ३१ हजार फूट उंचीवर उड्डाण करत असताना अचानक त्याचा स्फोट झाला होता. विमानातील सर्व ३०७ प्रवासी आणि २२ क्रू मेंबर्स मारले गेले. बॉम्बस्फोटात मारल्या गेलेल्यांच्या स्मरणार्थ कॅनडा दरवर्षी २३ जून रोजी दहशतवादाच्या बळींसाठी राष्ट्रीय स्मरण दिन साजरा करतो.

कॅनडातील राष्ट्रीय दैनिक 'द ग्लोब अँड मेल'मधील लेखात अँड्र्यू कोयन यांनी निज्जरच्या हत्येनंतर देशात शांतता राखण्याची गरज व्यक्त केली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news