पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेत पहिल्या दिवशी सोनिया गांधींच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्मृती इराणी म्हणाल्या की, गांधी कुटुंबाला फक्त त्यांच्या कुटुंबातील महिलांना सक्षम करण्यात रस आहे. यापूर्वी महिला आरक्षण विधेयक आमचे असल्याचे सोनियांनी म्हटले होते. तर विधेयकावर चर्चा सुरू असताना राहुल गांधीही निघून गेले. यावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गांधी कुटुंबाला लक्ष्य केले आहे. (Women's Reservation Bill)
संबधित बातम्या
महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू असताना राहुल गांधी यांनी सभागृह सोडल्याबद्दल आणि महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न दिल्याबद्दल काँग्रेस पक्षावर इराणी यांनी निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, यापूर्वी महिला आरक्षण विधेयक आमचे असल्याचे सोनियांनी म्हटले होते. काँग्रेसने सोमवारी (१८) म्हटले होते की पक्षाने मागणी केल्यामुळे ते या निर्णयाचे स्वागत करत आहे. आज सोनिया गैरहजर राहणे दुर्दैवी आहे.
पुढे बोलत असताना त्या असेही म्हणाल्या की,"हे आणखी दुर्दैवी आहे की जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांनी हे विधेयक मांडले तेव्हा त्याला कोणी पाठिंबा दिला? त्यामुळे भाजप आणि एनडीएने पाठिंबा दिला पण काँग्रेसने तसे केले नाही. प्रश्न उपस्थित करत त्या म्हणाल्या की, हा ढोंगीपणा का? तुम्ही मला उत्तर दिले नाही तरी तुम्ही जनतेला उत्तरदायी आहात.
महिला आरक्षण विधेयकाच्या माध्यमातून नव्या भारताचा पाया रचला गेला आहे. अनेक वर्षांच्या संघर्षावर तोडगा काढल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभारही यावेळी त्यांनी मानले.
हेही वाचा