Anil Kapoor on AI misuse | अनिल कपूरला हायकोर्टाकडून दिलासा, ‘पर्सनॅलिटी राइट्स’बाबत दिला महत्त्वाचा निर्णय | पुढारी

Anil Kapoor on AI misuse | अनिल कपूरला हायकोर्टाकडून दिलासा, 'पर्सनॅलिटी राइट्स'बाबत दिला महत्त्वाचा निर्णय

पुढारी ऑनलाईन : दिग्गज अभिनेता अनिल कपूर यांनी वैयक्तिक अधिकारांसर्भात (पर्सनॅलिटी राइट्स) दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वाटा निर्णय दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेता अनिल कपूरचे नाव, फोटोज, आवाज आणि सही याचा त्यांच्या संमतीशिवाय कोणत्याही व्यावसायिक हेतूंसाठी वापर करता येणार नसल्याचा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची थोडक्यात सुनावणी झाली. यावेळी दिल्ली हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. (Anil Kapoor on AI misuse)

अनिक कपूर यांनी AI चा गैरवापरासंदर्भात केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, सोशल मीडिया चॅनेल, वेबसाइट्स, मोबाइल ॲप्स या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्याचे नाव, आवाज आणि फोटोज त्यांच्या वैयक्तिक बाबींचा बेकायदेशीरपणे वापर केला जात आहे. यामुळे त्याचा सामाजिक प्रतिमेवर विपरीत परिणाम होत असल्याचेही अनिल कपूर यांनी केलेल्या याचिकेत म्हटले आहे. (Anil Kapoor on AI misuse)

Anil Kapoor on AI misuse: ‘हे’ डोमेन त्वरित ब्लॉक करण्याचे कोर्टाचे निर्देश

दिल्ली हायकोर्टाने अनिल कपूर यांच्या याचिकेवर अभिनेता अनिल कपूरचे नाव, प्रतिमा, आवाज यांचा व्यावसायिक हेतूंसाठी त्याच्या संमतीशिवाय वापर करण्यापासून विविध संस्थांना प्रतिबंधित केले आहे. तसेच http://Godaddy.com LLC, Dynadot LLC, PDR Limited हे डोमेन त्वरित ब्लॉक करावे आणि http://Anilkapoor.com यांसारखे इतर डोमेन निलंबित करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

हेही वाचा:

 

 

Back to top button