खलिस्तान्यांविरोधात NIA ॲक्शन मोडवर, १० वाँटेड संशयितांची माहिती मागवली

खलिस्तान्यांविरोधात NIA ॲक्शन मोडवर, १० वाँटेड संशयितांची माहिती मागवली
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मार्च २०२३ मध्ये अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासावरील हल्ल्यात सहभागी असलेल्या १० वाँटेड संशयितांची छायाचित्रे जारी केली आहेत. हे सर्वजण खलिस्तान समर्थक आहेत. त्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना शोधण्यासाठी एनआयएने त्यांची माहिती मागवली आहे. जे कोणी या संशयितांची माहिती देईल त्यांची ओळख उघड केली जाणार नसल्याची ग्वाही एनआयएने दिली आहे.

 संबंधित बातम्या 

खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जरच्या हत्येवरुन भारत आणि कॅनडातील द्विपक्षीय संबध बिघडले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निज्जरच्या हत्येचा आरोप 'रॉ' या भारतीय यंत्रणेवर ठेवला आहे. दरम्यान, एनआयएने वाँटेड आरोपींविरुद्ध तीन वेगळ्या नोटिसा जारी केल्या आहेत, ज्यामुळे संशयितांना ताब्यात अथवा अटक होऊ शकते अशी महत्त्वाच्या माहिती मागवली आहे. दोन नोटीसमध्ये प्रत्येकी दोन आरोपींची छायाचित्रे आहेत, तर तिसऱ्यामध्ये या प्रकरणात सहभागी असलेल्या अन्य सहा आरोपींची छायाचित्रे आहेत. NIA ने १० आरोपींबद्दल कोणतीही माहिती शेअर करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी जारी केले आहेत.

सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासावर १८-१९ मार्चच्या मध्यरात्री हल्ला झाला होता. त्यावेळी काही खलितानी समर्थकांनी वाणिज्य दूतावासात घुसून जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच दिवशी घोषणाबाजी करणाऱ्या खलिस्तानी समर्थकांनी शहर पोलिसांनी उभारलेले तात्पुरते सुरक्षा अडथळे तोडून वाणिज्य दूतावास संकुलात दोन खलिस्तानी झेंडे लावले होते. यावेळी त्यांनी इमारतीचे नुकसान केले आणि वाणिज्य दूतावासातील अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. यात अधिकारी जखमी झाले होते.

त्याचबरोबर १-२ जुलैच्या मध्यरात्री वाणिज्य दूतावासाचे अधिकारी इमारतीत असताना काही संशयितांनी वाणिज्य दूतावासात घुसून वाणिज्य दूतावासाला आग लावण्याचा प्रयत्न केला होता.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news