औरंगाबादेत एनआयए, एटीएसचे धाडसत्र, चौघे चौकशीसाठी ताब्यात

औरंगाबादेत एनआयए, एटीएसचे धाडसत्र, चौघे चौकशीसाठी ताब्यात
औरंगाबादेत एनआयए, एटीएसचे धाडसत्र, चौघे चौकशीसाठी ताब्यात

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा : एनआयएने देशभर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर धाडी टाकल्या आहेत. यात दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबादच्या जिन्सी भागातून चौघांना चौकशीसाठी उचलले आहे. बुधवारी रात्रीपासून ही कारवाई सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे मात्र अधिकृतपणे समजू शकली नाहीत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएकडून देशातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापेमारी सुरू आहे. ज्यात औरंगाबादच्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर सुद्धा एटीएस आणि एनआयएच्या पथकाने कारवाई केली आहे. औरंगाबादच्या जिन्सी भागात हे कार्यालय होते. तर या कारवाईत पथकाने एकूण चौघांना ताब्यात घेतले आहे.

एटीएसच्या कार्यालयाला स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त

टीव्ही सेंटर भागात पोलिस पेट्रोल पंपाजवळ एटीएसचे कार्यालय आहे. तेथे एकेकाला पकडून आणले जात आहे. तेथे गर्दी होऊ नये म्हणून स्थानिक सिडको पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक रतन डोईफोडे यांच्यासह पाच पोलिस बंदोबस्ताला आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news