Congress president elections | काँग्रेसकडून पक्षाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ‘या’ तारखेला होणार मतदान | पुढारी

Congress president elections | काँग्रेसकडून पक्षाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 'या' तारखेला होणार मतदान

नवी दिल्ली : काँग्रेसने पक्षाध्यक्ष निवडीसाठी (Congress president elections) अधिसूचना जारी केली आहे. यानुसार २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान नामनिर्देशनपत्रे दाखल होतील. जर आवश्यकता भासल्यास १७ ऑक्टोबर रोजी मतदान होईल आणि १९ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर केला जाईल. काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यासाठी २४ ते ३० सप्टेंबर दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत मुदत आहे. तर १ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होईल. पात्र उमेदवारांची यादी १ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी प्रसिद्ध केली जाईल.

अर्ज मागे घेण्यासाठी ८ ऑक्टोबर रोजी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. उमेदवारांची अंतिम यादी ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध केली जाईल. जर आवश्यकता भासल्यास १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ दरम्यान सर्व प्रदेश काँग्रेस कमिटी मुख्यालयात मतदान होईल. निवडणूक निकाल १९ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाणार असल्याचे काँग्रेसचे निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद केले आहे. (Congress president elections)

देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस आता मोठ्या बदलाच्या दिशेने जात आहे. दशकानंतर गांधी कुटुंबीयांबाहेरचा अध्यक्ष पक्षाला मिळू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार पक्षाच्या सध्याच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच पक्षातले वरिष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पक्षाध्यक्षपद स्वीकारण्याबाबत आग्रह केल्याचे समजते. दरम्यान, शशी थरुर यांच्या नावाचीही चर्चा सुरु आहे.

हे ही वाचा :

Back to top button