NEET 2021 : दोन विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

सर्वोच्‍च न्‍यायालय ( संग्रहित छायाचित्र )
सर्वोच्‍च न्‍यायालय ( संग्रहित छायाचित्र )

दोन विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट परिक्षेचा ( NEET 2021 ) निकाल जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याच्या आदेशाला नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या पार्श्वभूमीवर निकाल जाहीर करण्यास वेळ लागत असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते.

 NEET 2021 : केवळ दोन विद्यार्थ्यांसाठी परिक्षेचा निकाल रोखला जाऊ शकत नाही

गत सप्टेंबर महिन्यात देशभरातील 16 लाख विद्यार्थ्यांनी 'नीट' परीक्षा दिली होती. मात्र विविध कारणांमुळे निकाल लांबला होता, त्यातच दोन विद्यार्थ्यांच्या फेरपरिक्षेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. सर्व घटकांचे हित लक्षात घेणे गरजेचे आहे. केवळ दोन विद्यार्थ्यांसाठी परिक्षेचा निकाल रोखला जाऊ शकत नाही. 16 लाख विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे 'एनटीए'ने लवकरात लवकर निकाल जाहीर करावा, अशी टिप्पणी न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांनी सुनावणीवेळी केली. दोन विद्यार्थ्यांचे हितदेखील लक्षात घेणे आवश्यक आहे, त्यांना अधांतरी सोडले जाऊ नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news