NED vs ENG : इंग्लंडचा नेदरलॅन्डवर 160 धावांनी विजय, गतविजेते सातव्या स्थानी; नेदरलँड स्पर्धेबाहेर

NED vs ENG : इंग्लंडचा नेदरलॅन्डवर 160 धावांनी विजय, गतविजेते सातव्या स्थानी; नेदरलँड स्पर्धेबाहेर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विश्वचषक 2023 मध्ये गतविजेत्या इंग्लंडने आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात बुधवारी नेदरलँडवर 160 धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडच्या खात्यात दोन गुण जमा झाले. या विजयामुळे गुणतालिकेत इंग्लंड दहाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, नेदरलँडचा संघ आठ सामन्यांतील सहाव्या पराभवासह विश्वचषकातून बाहेर पडला आहे.

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर संघाने 50 षटकांत 9 बाद 339 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 37.2 षटकांत 179 धावांवर गारद झाला. या पराभवासह विश्वचषकातून बाहेर पडणारा हा चौथा संघ ठरला आहे.

नेदरलँडकडून तेजा निदामनुरूने सर्वाधिक नाबाद 41 धावा केल्या. कर्णधार स्कॉट एडवर्डसने 38 आणि वेस्ली बॅरेसीने 37 धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अली आणि आदिल रशीदने प्रत्येकी तीन बळी घेतले. डेव्हिड विलीने दोन गडी टिपले.
तत्पूर्वी, अनुभवी फलंदाज बेन स्टोक्सने इंग्लंडकडून 108 धावा केल्या. त्याने 84 चेंडूंच्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले.

स्टोक्सचे हे विश्वचषक इतिहासातील पहिले शतक ठरले. डेव्हिड मलानने 87 आणि ख्रिस वोक्सने 51 धावा केल्या. नेदरलँडकडून बास डी लिडे याने सर्वाधिक तीन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड : 50 षटकांत 9 बाद 339. स्टोक्स 108, मलान 87, वोक्स 51. बास डी लिडे 3 बळी.
नेदरलँड : 37.2 षटकांत सर्वबाद 179. निदामनुरू नाबाद 41, एडवर्डस 38, बॅरेसी 37. मोईन अली व आदिल रशीद प्रत्येकी 3 बळी.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news