अग्निपथ योजना : नौदलात महिलांना संधी, पहिल्यांदाच नाविक पदी भरती होणार

अग्निपथ योजना : नौदलात महिलांना संधी, पहिल्यांदाच नाविक पदी भरती होणार

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : नवीन अग्निपथ योजनेद्वारे (Agnipath scheme) नौदल यावर्षी पहिल्यांदाच महिलांची नाविक (women sailors) पदावर भरती करणार आहे. यामुळे येत्या काळात त्यांना युद्धनौकांवरही तैनात करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यावर्षी नौदलात ३ हजार अग्निवीरांचा समावेश केला जाणार आहे. पण त्यात महिलांची संख्या नेमकी किती असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण २१ नोव्हेंबर रोजी ओडिशातील INS चिल्का या ठिकाणी प्रशिक्षण सुरू करणार्‍या पहिल्या तुकडीतील १०-२० टक्के महिलांचा त्यात समावेश असण्याची शक्यता असल्याचे वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे.

अग्निवीर योजनेतर्गंत नौदलातील भरतीत महिला आणि पुरुष या दोन्हींचा समावेश असणार आहे. सध्या ३० महिला अधिकारी आघाडीच्या युद्धनौकांवर सेवा बजावत आहेत. आता महिलांची नाविक म्हणूनदेखील भरती करण्याची वेळ आली आहे. सर्व ट्रेड्समध्ये महिलांची भरती करण्याचा निर्णय घेतला असल्याचे चीफ ऑफ पर्सनल व्हाईस अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी म्हटले आहे.

१९९० पासून सशस्त्र दलांत महिलांचा समावेश करण्यात आला आहे. पण २०१९-२०२० पर्यंत फक्त अधिकारी पदांवर त्यांची भरती झाली. सशस्त्र दलातील सुमारे ७ हजार अधिकाऱ्यांच्या कॅडेरमध्ये महिलांची संख्या ३,९०४ एवढी आहे. यात सैन्य दल १,७०५, हवाई दल १,६४० आणि नौदलात ५५९ महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सशस्त्र दलात ९ हजार अधिकाऱ्यांची कमतरता आहे.

लष्कराने २०१९-२०२० मध्ये प्रथमच इतर रँकमधील महिलांची भरती सुरू केल्यानंतर आता Corps of Military Police (CMP) मध्ये १०० महिला जवान आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत आणखी १९९ सीएमपी महिलांची भरती थांबवण्यात आली होती. आयएनएस चिल्का येथे त्यांना सामावून घेण्याची व्यवस्था केली जात असतानाही पहिल्या तुकडीत अग्निवीर म्हणून नेमक्या किती टक्के महिलांना समाविष्ट करून घ्यायचे आहे, यावर अद्याप विचार सुरु असल्याचे व्हाइस अॅडमिरल त्रिपाठी यांनी सांगितले.

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news