NTA exam calendar 2024 | जेईई मेन, NEET, CUET-PG परीक्षांच्या तारखा जाहीर

NTA exam calendar 2024 | जेईई मेन, NEET, CUET-PG परीक्षांच्या तारखा जाहीर

पुढारी ऑनलाईन : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठीच्या प्रमुख परीक्षांचे वेळापत्रक जारी केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी पदव्युत्तर कार्यक्रमांसाठी (CUET-PG) कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा ११ मार्च २०२४ ते २८ मार्च २०२४ या कालावधीत नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाणार असल्याची माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाने दिली आहे. (NTA exam calendar 2024)

संबंधित बातम्या 

संगणकीय आधारीत जेईई मेन (JEE Main) ची पहिल्या सत्रातील (Session 1) संयुक्त प्रवेश परीक्षा २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२४ दरम्यान होईल. तर जेईई मेनची दुसऱ्या सत्रातील (Session 2) प्रवेश परीक्षा १ एप्रिल २०२४ आणि १५ एप्रिल २०२४ दरम्यान होईल. राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET-UG) ५ मे २०२४ रोजी होणार आहे. विद्यापीठ प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा UG (CUET-UG) १५ मे २०२४ आणि ३१ मे २०२४ दरम्यान होईल.

यूजीसी-नेट (UGC-NET) ची पहिल्या सत्रातील परीक्षा १० जून आणि २१ जून दरम्यान होणार असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने म्हटले आहे.

जेईई मेन परीक्षा आयआयआयटी, एनआयटी आणि इतर सहभागी अभियांत्रिकी महाविद्यालयांद्वारे ऑफर केलेल्या पदवीपूर्व अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित केली जाते. ही IIT JEE Advanced साठी पात्रता परीक्षा म्हणून देखील काम करते. (NTA exam calendar 2024)

नीट- यूजी ही देशभरातील सर्व संस्थांमध्ये पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशासाठी आहे.

विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी https://www.nta.ac.in/ यावर भेट द्यावी.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news