नाशिक : वारकर्‍यांना मिळणार फिरत्या दवाखान्याची मोफत सेवा; आजच होणार लोकार्पण

सिन्नर : वारकर्‍यांसाठी लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे पतसंस्थेने फिरता दवाखाना.
सिन्नर : वारकर्‍यांसाठी लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे पतसंस्थेने फिरता दवाखाना.
Published on
Updated on

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या श्री संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्यासोबत येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे पतसंस्थेचा फिरता दवाखाना सहभागी होऊन वारकर्‍यांची आरोग्य सेवा करणार आहे. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. बुधवारी (दि. 7) संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे सिन्नर येथे आगमन होणार असून या मुहूर्तावर फिरता दवाखान्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर दिंडीसोबत हा दवाखाना 20 दिवस सेवा देणार आहे. वारकर्‍यांची मोफत सेवा याद्वारे केली जाणार आहे. सर्दी, ताप, खोकल्यासारख्या किरकोळ आजारांवर वारकर्‍यांना जागेवर उपचार मिळतील. दरवर्षी ही सेवा देण्यात येणार आहे. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते वाजे पतसंस्थेने विविध लोकिप्रय उपक्रम राबवले आहेत. डुबेरे येथे कोणत्याही नागरिकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीचा खर्च, शासकीय रुग्णालयात बेवारस मृतदेहांच्या शवविच्छेदनाचा खर्च 14 वर्षांपासून केला जात आहे. तालुक्यातील सर्वच गावात वैकुंठ रथाची सेवा सात वर्षापासून सुरू आहे. सिन्नर येथील प्रसिद्ध लोकनेते वाजे अभ्यासिकेलाही संस्थेची मदत लाभली आहे.

दिंडीनंतरही फिरता दवाखाना देणार सेवा
दिंडीनंतर तालुक्यातील विविध मार्गांवरील गावांत फिरता दवाखाना दिलेल्या दिवशी उपलब्ध होईल. आरोग्य तपासणी व उपचार पूर्णपणे मोफत असतील. औषधांचा खर्चही पतसंस्था करणार आहे. फिरता दवाखान्यात डॉक्टर, दोन मदतनीस व चालक सेवा देणार असल्याचे पतसंस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news