अंबाजोगाई : तीक्ष्ण हत्याराने वीस वार करून शेतकऱ्याची निर्घृण हत्या | पुढारी

अंबाजोगाई : तीक्ष्ण हत्याराने वीस वार करून शेतकऱ्याची निर्घृण हत्या

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील केंद्रेवाडी मध्ये (मंगळवार) रात्री १२.३० वाजण्याच्या दरम्यान एका शेतकऱ्याची तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली. त्यांच्या मुलाचा विवाह सोहळा तीन दिवसांवर आलेला आहे. त्‍यातच ही घटना घडली आहे.

दत्ता गायके (वय ४८) असे खून करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. त्यांच्यावर २० पेक्षा अधिक वार करत निर्घृण खून करण्यात आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून, घटनास्थळी जावयाची मोटारसायकल आढळली आहे. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, मृतदेह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे.

मृत दत्ता गायके यांना पाच एकर कोरड वाहू जमीन असल्याने ते मोल मजुरी करून उपजीविका भागवत होते. त्यांना दोन मुली असून, त्या दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहे. मुलाचं लग्न दोन तीन दिवसांवर असल्याने मुली आणि जावई हे लग्नासाठी केंद्रेवाडीत आलेले होते. मात्र रात्री तिक्ष्ण हत्याराने वार करत गायके यांचा खून करण्यात आला.

हेही वाचा : 

Back to top button