Nashik : मनी नात डेप्युटी कलेक्टर व्हयनी…!, देवळ्याच्या दोन भूमिकन्या उपजिल्हाधिकारी

Nashik : मनी नात डेप्युटी कलेक्टर व्हयनी…!, देवळ्याच्या दोन भूमिकन्या उपजिल्हाधिकारी
Published on
Updated on

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

मनी नात डेप्युटी कलेक्टर व्हयनी, हाऊ आनंद मोठा शे. आमले तिना अभिमान वाटस', ही प्रतिक्रिया आहे माजी नगरसेविका वत्सलाबाई आहेर यांची. त्यांची नात तेजस्विनी प्रफुल्ल आहेर हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविल्याची बातमी कानी पडताच त्यांनी ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली.

कुटुंबाची साथ, आत्मविश्वास अन् प्रामाणिक साधनेच्या जोरावर येथील तेजस्विनीने उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली. राज्यसेवा २०२१ स्पर्धा परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला. त्यात तिने इतर मागासवर्गसंवर्गात राज्यात मुलींमध्ये दुसरी तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत १०३ रैंक प्राप्त केली. तिचे मूळ गाव देवळा असून माजी सरपंच (कै.) पीकेअप्पा आहेर यांची ती नात आहे. कुटुंबात राजकारणाचा वारसा असला तरी प्रशासकीय सेवेत करियर करायचे या ध्येयाने वाटचाल करीत तिने 'तेजस्विनी' हे नाव सार्थ ठरविले. तिचे प्राथमिक शिक्षण देवळा येथे झाले. बारावीनंतर तिने सिंहगड कॉलेज (पुणे) येथे इंजिनिअरिंगची मेकॅनिकल पदवी मिळवत २०१७ पासून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. सलग दहा-अकरा तासांचा अभ्यास, वर्तमानपत्रातील टिपणे, संदर्भ पुस्तकांचे वाचन यातून हा यशाचा मार्ग गवसल्याचे 'तेजस्विनी' ने सांगितले. आई जयश्री व वडील प्रफुल्ल आहेर हे शेती करतात. तर काका सुनील आहेर हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तर, काकू जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या डॉ. नूतन आहेर हे राजकारण व समाजकारणात सक्रिय आहेत.

तिचे टोपण नाव 'लकी' असून तिने खऱ्या अर्थाने कष्टातून लक सिद्ध केल्याने तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. दरम्यान, तालुक्याची दुसरी भूमिकन्या वाजगाव येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गा देवरे हिची देखील उपजिल्हाधिकारी पदावर (खेळाडूंसाठी असलेल्या राखीव जागेतून) निवड झाली आहे. तिचेही कौतुक होत आहे.

धीर खचू न देता प्रयत्न व आत्मविश्वास कायम जीवंत ठेवल्याने हे यश मिळवू शकले. ग्रामीण भागातील मुला- मुलींनी मोबाईलचा अभ्यासासाठी वापर करत आणि वेळेचा सदुपयोग करत करिअर करावे.

तेजस्विनी आहेर, देवळा

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news