'पहिल्या दिवसापासूनच विजयाची खात्री' ; रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया | पुढारी

'पहिल्या दिवसापासूनच विजयाची खात्री' ; रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया

पुढारी डिजिटल : अत्यंत उत्कंठा वाढलेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज लागला. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना६७९५३ मते तर, भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना ५८९०४ एवढी मतं मिळाली . रवींद्र धंगेकर अकरा हजार मतांनी विजयी झाले आहेत.

केवळ ५० % मतदान झालेल्या कसब्यात ही पोटनिवडणूक माविआ आणि भाजप या पक्षांनी प्रतिष्ठेची बनवली होती. प्रचारासाठी राजकारणातील महारथींनी कंबर कसली होती. पण जनतेने कौल धंगेकरांच्या बाजूने दिला. सोशल मीडियावरही धंगेकरांच्या बाजूने बरेचसे जनमत दिसून येत होत. या एकंदरीत विजयावर रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया समोर आली, ‘ते म्हणतात, मला विजयाची खात्री होतीच. जनतेने त्यांच्यासाठी काम करणाऱ्या माणसाला विजय मिळवून दिला आहे.’ यांनतर आता उद्धव ठाकरे साहेब यांची भेट घेणार असून माजी खासदार गिरीश बापट यांचीही भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Back to top button