पनवेल – तीन वर्षीय मुलीवर अत्याचार, आरोपीचा शोध सुरू | पुढारी

पनवेल - तीन वर्षीय मुलीवर अत्याचार, आरोपीचा शोध सुरू

पनवेल : पुढारी वृत्तसेवा – पनवेल रेल्वे स्थानकाच्या परिसरात एका तीन वर्षीय मुलीवर बलात्काराची घटना शुक्रवारी सकाळी  घडल्याचे उघड झाले आहे. ही घटना समजतात पनवेल रेल्वे पोलीसानी  घटनास्थळी भेट देऊन घटनेची पहाणी केली आणि आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेनंतर या चिमुकलीवर पनवेलमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

ही मुलगी आपल्या आईसोबत पनवेल रेल्वे स्थानकात झोपली होती. आई झोपल्या असल्याचा फायदा घेऊन एका नराधमाने, या तीन वर्षीय मुलीला उचलून नेले. रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेल्या झाडाझुडपात तिच्यावर अत्याचार केला आणि तो फरार झाल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. सकाळी उठल्यानंतर मुलगी गेली कुठे याचा शोध सुरू केल्या नंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

Back to top button