नाशिक : पुढारी ऑनलाइन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे हिवाळी अधिवेशानापर्यंत निलंबन केल्याने नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून राष्ट्रवादी भवन येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी "निर्ल्लज सरकारचा निषेध असो", "५० खोके एकदम ओके, "इडी सरकार हाय हाय" अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अॅड रविंद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, विष्णुपंत म्हैसधुणे, संजय खैरनार, बाळासाहेब कर्डक, निवृत्ती अरिंगळे आदि उपस्थित होते.
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु अाहे. काल विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्यामुळे जयंत पाटील सभागृहात संतापले. या संतापात जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना असंसदीय शब्द वापरल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर ठिकठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. जयंत पाटील हे विधानसभा अध्यक्षांना उद्देशून न बोलता शिंदे-फडणवीस सरकारला उद्देशून बोलले आहेत, त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे.
या प्रसंगी सलीम शेख, डॉ. योगेश गोसावी, किशोरी खैरनार, बाळासाहेब गीते, मनोहर कोरडे, नदीम शेख, सुनिल अहिरे, माजी नगरसेवक जगदीश पवार, राजेंद्र शेळके, योगेश दिवे, नाना पवार, प्रकाश थामेत, पूजा आहेर, योगिता पाटील, रुपाली पठाडे, शादाब सय्यद, मुकेश शेवाळे, बाळा निगळ, राहुल कमानकर, अमोल नाईक, किरण पानकर, कुलदीप जेजुरकर, गणेश गायधनी, दिनेश धात्रक, महेश शेळके, रियान शेख, योगेश इंगोळे, प्रथमेश पवार, ज्ञानेश्वर महाजन, गणेश गीते, रविंद्र शिंदे, सोपान कडलग आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.