कांदा बाजार भावातील घसरण थांबविणेसाठी शासन स्तरावर तांतडीने उपाययोजना करण्यात यावी यासाठी शिवसेनेचे निफाड तालुका प्रमुख प्रकाश पाटील, कांदा व्यापारी प्रविण कदम, सामाजिक कार्यकर्ते विकास कोल्हे, प्रमोद पाटील, संदिप कोल्हे, संदिप पवार, गणेश कुलकर्णी, केशवराव जाधव ,फिरोज मोमीन, बापूसाहेब मोकाटे, संदीप पवार, शोएब शेख आदी शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे, केंद्रीय़ आरोग्य मंत्री भारतीताई पवार यांची मनमाड येथे मंगळवार (दि. १३) रोजी समक्ष भेट घेत तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.