आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला स्‍पर्धकच नाही : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा विश्‍वास

गृहमंत्री अमित शहा
गृहमंत्री अमित शहा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्त्‍वाखाली देश वेगाने  प्रगती करत आहे. देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मनापासून वाटचाल करत आहेत.  त्‍यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला कोणती स्‍पर्धाच नाही. २०२४ मध्‍ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीत  भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष कोण असेल? हे देखील जनताच ठरेवल, असे मत  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

'एएनआय'ला दिलेल्या विशेष मुलाखतीवेळी अमित शहा यांनी विविध प्रश्‍नांवर आपली भूमिका स्‍पष्‍ट केली. ते म्‍हणाले, केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे देशातील तळागाळातील लोकांच्या जीवनात लक्षणीय सकारात्मक बदल झाले आहेत. देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मनापासून वाटचाल करत आहेत.  त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी  भाजपसमोर "कोणतीही स्पर्धा" नाही. विरोधी पक्ष कोणता असेल हे देशातील जनताच ठरेवल".

विधानसभा निवडणुकीत भाजप चांगली कामगिरी करेल

काँग्रेस आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना, शहा म्हणाले की, त्यांनी कदाचित निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये प्रचार केला नसेल किंवा नसेल. परंतु येणाऱ्या त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमधील निवडणुकांचे निकाल हे एकेकाळी वर्चस्व असलेल्या राज्यांमध्ये विरोधी पक्षाची ताकद दर्शवतील. कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये यंदाच्या निवडणुकीत भाजप चांगली कामगिरी करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लपवणे आणि घाबरण्यासारखे काहीच नाही

हिंडेनबर्ग रिपोर्ट आणि अदानी या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. मंत्रिमंडळाचा सदस्य असल्याने या विषयावर मी सध्या काहीही बोलणे योग्य ठरणार नाही; पण भाजपकडे लपवण्यासारखे काही नाही आणि घाबरण्यासारखे काहीही नसल्याचेही अमित शहा म्‍हणाले.

शहरांचे नामांतरणात मोठे काम

भाजपने आपल्या कारकिर्दीत अनेक शहरांचे नामांतर केले आहे. याबाबत शहा म्हणाले, शहरांच्‍या नामांतरणाबाबत आमच्या सरकारने अतिशय काळजीपूर्वक निर्णय घेतले आहेत. प्रत्येक सरकारला हा कायदेशीर अधिकार असल्याचेही त्‍यांनी यावेळी नमूद केले.

नक्षलवाद, दहशतवाद संपवण्यात सरकार यशस्वी

बिहार आणि झारखंडमध्ये नक्षलवादी बंडखोरी जवळपास संपली आहे. मला खात्री आहे की छत्तीसगडमध्येही लवकरच नक्षलवाद संपून, शांतता प्रस्थापित करण्यात आम्ही यशस्वी होऊ. जम्मू-काश्मीरमध्ये देखील अनेक दहशतवादी कारवाया उलतवून टाकण्यात यश मिळाले असून, येथील दहशतवादाशी संबंधित सरकारची कामगिरी सर्वोत्कृष्ट असल्याचेही त्‍यांनी मुलाखतीवेळी सांगितले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news