नाशिक : तळेगाव दिंडोरी येथे बनावट किटकनाशकांचा साठा जप्त, कृषी विभागाच्या भरारी पथकाची कार्यवाही

नाशिक
नाशिक

दिंडोरी;  पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व भाजीपाला ही पिके मुख्य असून; खरीप हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांकडून किटकनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यादृष्टीने आज कृषी विभागाच्या भरारी पथकाकडुन दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील नंदिनी किचन ॲप्लिकेशन प्रा. लि. यांच्या आवरात बनावट किटकनाकाचा साठा असल्याचा संशय कृषी विभागाला आल्यामुळे तात्काळ कारवाई केली.

अधिकृत किटकनाशके विक्रेते यांचे व्यतिरिक्त शेतकऱ्यांना अनाधिकृत व्यक्तीकडून कमी दरात बनावट किटकनाशके उपलब्ध करून दिले जात असल्याचा संशय कृषी विभागास होता. कृषी विभागाने (नाशिक) सापळा रचून विभागीय कृषी सहसंचालक नाशिक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सोनवणे, तंत्र अधिकारी (गु.नि) संजय शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नितेंद्र पानपाटील (विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, नाशिक) यांच्या सहकार्याने जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अभिजीत घुमरे यांनी ही कारवाई केली. जिल्हा भरारी पथकाने बनावट किटकनाशकाचा सुमारे २९५ किलो/लिटरचा साठा जप्त केला असून, त्याचे बाजार मूल्य सुमारे रु. ६.१६ लाख एवढे आहे. कारवाईच्या वेळी कृषी अधिकारी प.समिती दिंडोरी श्री.दिपक साबळे, कृषी अधिकारी, पंचायत समिती दिंडोरी हे उपस्थित होते.

संशयीत दिपक मोहन अग्रवाल  यांच्या  विरुद्ध किटकनाशक  कायदा १९६८, किटकनाशक नियम १९७१, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत अभिजीत घुमरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, नाशिक यांनी पोलिस ठाणे दिंडोरी येथे फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news