

पुढारी ऑनलाईन डेस्क : अॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने (AIU) थाळीफेकपटू कमलप्रीत कौरवर (Kamalpreet Kaur Ban) तीन वर्षांची बंदी घातली आहे. बुधवारी, एआययूने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, 26 वर्षीय खेळाडूवर तिच्या शरिरात प्रतिबंधित पदार्थ (स्टेनोझोलॉल) आढळल्याने किंवा त्याचा वापर केल्यामुळे वापरल्यामुळे तिच्यावर बंदी घालण्यात आली आहे. एआययूने एका अहवालात सांगितले होते की, नमुना यावर्षी ७ मार्च रोजी पटियाला येथे घेण्यात आला होता. त्यानंतर ते चाचणीसाठी पाठवले असता त्यात स्टॅनोझोलॉलचे अंश आढळून आले.
कमलप्रीत कौरवरील (Kamalpreet Kaur Ban) बंदी २९ मार्च २०२२ पासून लागू होणार आहे. ती पुढील तीन वर्षे कोणत्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही, ७ मार्चनंतर तिने सहभागी झालेल्या कोणत्याही स्पर्धचा निकाल विचारात घेतला जाणार नाही. एआययूने २९ मार्च रोजी तिला तात्पुरते निलंबित केले होते. तिच्या चाचणीत असे आढळून आले की, त्याने फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रोटीन सप्लिमेंटचे दोन स्कूप सेवन केले होते, ज्यामध्ये स्टॅनोझोलॉलचे अंश आढळून आले होते.
कमलप्रीत कौरने टोकियो २०२० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तिने पात्रता फेरीत ६४ मीटरची सर्वोत्तम थाळी फेकली होती. ३१ खेळाडूंच्या यादीत ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. अंतिम फेरीमध्ये तिने ६३.७ मीटरच्या सर्वोत्तम थाळी फेकून सहावे स्थान पटकावले. तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ६६.५९ मीटर आहे. तेवढी फेक करण्यात ती यशस्वी झाली असती तर तिला कांस्यपदक मिळाले असते.
कमलप्रीत कौरने गेल्या वर्षी इंडियन ग्रांप्रीमध्ये राष्ट्रीय विक्रम केला होता. जूनमध्ये, तिने ६६.५९ मीटर थ्रोसह राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान निश्चित केले.
हेही वाचा;