Nashik News : टॅंकर येताच महिलांची झुंबड, ३८० गावे-वाड्या तहानलेल्या

संग्रहित
संग्रहित
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नवीन वर्षाच्या प्रारंभी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. तब्बल १३१ गावे आणि २४९ वाड्या असे एकूण ३८० ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. या सर्व ठिकाणी १०८ टॅंकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. गावात टँकर येताच पाणी भरण्यासाठी महिलावर्गाची झुंबड उडते आहे. (Nashik News)

जानेवारी महिना उजाडला असताना म्हणावी तशी थंडी अद्यापही जाणवली नाही. त्यामुळे जिल्हावासीयांना गुलाबी थंडीची प्रतीक्षा कायम असताना ग्रामीण भागाला पाणीटंचाईला सामाेरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील पंधरापैकी तब्बल ७ तालुक्यांत टँकरचा फेरा सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने पाणीपुरवठ्याकरिता १०८ टँकर मंजूर केले आहेत. या टँकरच्या दिवसभरात २५६ फेऱ्या होत आहेत. या टँकरच्या सहाय्याने ३८० गावे-वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे.

टंचाईचा सर्वाधिक फटका नांदगाव तालुक्याला बसत आहे. तालुक्यामधील ३७ गावे तसेच १६२ वाड्या अशा १९९ ठिकाणी ३५ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. त्याखालोखाल येवला तालुक्यातील ४५ गावे व १५ वाड्यांना २३ टँकरच्या सहाय्याने पाणी पुरविले जात आहे. मालेगाव व बागलाणला प्रत्येकी १५ टँकर धावताहेत. याशिवाय चांदवडला ११, सिन्नर ९ व देवळ्यात आठ टँकर सुरू आहेत. दरम्यान, प्रशासनाने पाणीपुरवठ्याकरिता ४७ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. यातील २१ गावांसाठी, तर २६ विहिरी या टँकर भरण्यासाठी उपयोगी ठरत आहेत. (Nashik News)

टँकरची सद्यस्थिती (Nashik News)

तालुका(गावे-वाड्या)संख्या
नांदगाव१९९३५
येवला६०२३
चांदवड२८१५
मालेगाव२७१५
चांदवड२८११
सिन्नर०९०९
देवळा३५०८
एकूण३८०१०८

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news