नाशिक : पुढारी वृत्तसेवा
निर्विघ्न गणेशोत्सवासाठी पोलिस सरसावले असून, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून गुन्हेगारांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. त्या अंतर्गत शहरातील २५६ संशयितांवर प्रतिबंधात्मक, 13 गुन्हेगारांना तडीपार, दोघांना मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध, तर एकावर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे.
संबधित बातम्या :
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दोन्ही परिमंडळांतील उपआयुक्तांना विभागीय सहायक आयुक्तांमार्फत प्रतिबंधात्मक कारवाईत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. पंचवटी, सातपूर, सरकारवाडा आणि नाशिकरोड विभागातील सहायक आयुक्तांनी हद्दीतील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम राबविली आहे. काही संशयितांवर गुन्हे दाखल करत कलम १०७ व ११० अंतर्गत वर्तणूक सुधारणा प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले आहे.
दरम्यान, गुन्हेगारी कृत्य वारंवार करणाऱ्या संशयितांविरोधात तडीपारी प्रस्तावित करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सवातही प्रतिबंधात्मक स्वरूपात कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे उत्सवकाळात शहरातील गुन्हेगारी आटोक्यात राहण्याची शक्यता वर्तविली जात आहेत.
कारवाईचा तपशील
तडीपार – १३
स्थानबद्ध – २
मोक्का – १
मनाई आदेश उल्लंघन – ९७
जुगार, दारूबंदी – १०
कलम १०७ – ९२
कलम ११० –
हेही वाचा :