‘सनातन धर्म संपवावा लागेल’, उदयनिधी स्टॅलिन यांचं पुन्हा वादग्रस्त विधान | पुढारी

'सनातन धर्म संपवावा लागेल', उदयनिधी स्टॅलिन यांचं पुन्हा वादग्रस्त विधान

पुढारी ऑनलाईन डेस्क : “सनातन धर्माचे मलेरिया, डेंग्यू, कोरोना किंवा अन्य रोगांप्रमाणे उच्चाटन झाले पाहिजे,” असे विधान करून तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. आता पुन्हा एकदा उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर वादग्रस्त विधान केले आहे. “अस्पृश्यता संपवायची असेल तर सनातन धर्म संपवावा लागेल,” असे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या : 

स्टॅलिन यांनी तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांच्या विधानाला हे प्रत्यूत्तर दिले आहे. “दुर्दैवाने आपल्या समाजात काही भेदभाव आहे. मोठ्या वर्गातील बंधू-भगिनींकडे समानतेने पाहिले जात नाही. असे करण्याचा हिंदू धर्मात कुठेही उल्लेख नाही. हे एक सामाजिक दुष्कृत्य आहे आणि ते निश्चितपणे दूर केले पाहिजे,” असे राज्यपाल यांनी म्हटले होते. याला प्रत्युत्तर देताना स्टॅलिन म्हणाले की, जातिभेद संपवण्यासाठीच सनातन धर्म संपवायला हवा. सनातनचा नाश झाला तर अस्पृश्यताही नष्ट होईल.

भाजप अडथळे निर्माण करते…

दरम्यान, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी ऑल इंडिया फेडरेशन फॉर सोशल जस्टिसच्या परिषदेत सांगितले की, आम्ही सर्वजण सामाजिक न्याय राखण्यासाठी सातत्याने लढा देत आहोत, मात्र भाजप त्यात खूप अडथळे निर्माण करत आहे. गरीब आणि मागासवर्गीय लोकांची स्थिती सुधारावी असे भाजपला वाटत नाही. जेव्हा द्रमुकने सरकार स्थापन केले तेव्हा आम्ही सामाजिक न्याय देखरेख समिती स्थापन केली, जी सामाजिक न्याय योग्यरित्या राखली जात आहे की नाही यावर लक्ष ठेवेल. त्याचप्रमाणे सर्व राज्यांनी ‘सामाजिक न्याय देखरेख समिती’ स्थापन करावी, असे ते म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button