Shevai Kheer : नवरात्रौत्सवाच्या उपवासासाठी तुपातील स्पेशल खीर | पुढारी

Shevai Kheer : नवरात्रौत्सवाच्या उपवासासाठी तुपातील स्पेशल खीर

नवरात्रौत्सवात नऊ दिवस उपवास केले जातात. काही जण फक्त एक खजूर आणि पाणी यावर उपवास धरतात. यावेळी आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे आहे. उपवासासाठी आजचा खास पदार्थ म्हणजे तुपातील शेवयाची खीर, यातील सुका मेवा आरोग्यासाठी खूपच आवश्यक आङे. उपलास करत असाल तर हेल्दी खाणे, खूप गरजेचे आहे. तुपातील शेवयाची खीर सर्वांना नक्कीच आवडेल. (Shevai Kheer )

आहारात सुका मेव्याचा वापर खूप लाभदायक आहे. सुका मेव्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, पोषक तत्वे, खनिजे आणि स्निग्ध पदार्थ असतात. (Shevai Kheer) मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि पोषक तत्वे असतात, जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. सुका मेव्यात ऑर्गेनिक ॲसिड, एमीनो ॲसिड आणि ओमेगा ३ फॅटी ॲसिड आणि सेलेनियम, मॅग्नेशियम, झिंक, कॅल्शियम आणि फास्फॉरससह फायबर मोठ्या प्रमाणात असतात. साजूक तुपातील शेवयाची खीर कशी बनवायची, हे पाहुया.

No Image

Recipe By स्वालिया शिकलगार

Course: Cusine: महाराष्ट्रीयन Difficulty: : सोपे

Servings

५ minutes

Preparing Time

२५ minutes

Cooking Time

२० minutes

Calories

kcal

INGREDIENTS

  1. शेवया

  2. फुल फॅट दूध

  3. साजूक तूप

  4. साखर

  5. वेलदोडे

  6. काजू

  7. पिस्ता

  8. बदाम

  9. चारोळे

  10. मणुके

  11. आक्रोड

DIRECTION

  1. दूध तापवून घ्या

  2. त्याआधी बदाम, चारोळे पाण्यात भिजवत घालावे

  3. नंतर बदाम, चारोळे पाण्यातून काढून बारीक तुकडे करून घ्यावेत

  4. आक्रोड, पिस्ता आणि काजूचे बारीक काप करून घ्यावेत

  5. वेलदोडे भाजून घेऊन त्याची पूड करावी

  6. गॅस मंद आचेवर ठेवून कढई किंवा पातेलं ठेवावे

  7. त्यात दोन चमचे साजूक तूप घालावे

  8. तूप पातळ होऊ द्या. त्यात शेवया भाजून घ्या

  9. शेवया बाजूला ठेवून द्या

  10. त्याचच दूध ओतून उकळ काढावी

  11. त्यात गोडीनुसार साखर आणि शेवया घालाव्यात

  12. वरून वेलदोडे पूड घालावे

  13. आता सर्व सुका मेवा घालून हळूहळू दूध ढवळत राहावे

  14. खीर १० मिनिटे शिजू द्यावी

  15. गॅस बंद करून खीरीचे पातेलं उतरून ठेवावे

NOTES

    Back to top button