नाशिकरोड : निवडणुकीचे निकाल घोषित होताच विजयाची खूण दाखवत  आनंद व्यक्त करताना विजयी उमेदवार. (छाया: उमेश देशमुख)
नाशिकरोड : निवडणुकीचे निकाल घोषित होताच विजयाची खूण दाखवत आनंद व्यक्त करताना विजयी उमेदवार. (छाया: उमेश देशमुख)

नाशिक : बिझनेस बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी

Published on
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील बिझनेस बँकेच्या निवडणुकीची सोमवारी (दि.३१) सकाळी मतमोजणी होऊन या मतमोजणीत सहकार पॅनलचे सर्व १४ उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले. या निवडणुकीत सहकार पॅनलचे पाच उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.

या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून 14 जागांसाठी 15 उमेदवार रिंगणात होते. जेलरोड येथील कोठारी कन्या शाळेत रविवारी (दि.३०) झालेल्या मतदान प्रक्रियेत सुमारे सत्तावीस टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी येथील कुलथे मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी फय्याज मुलाणी यांच्या उपस्थितीत मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातीपासूनच सहकार पॅनलचे सर्व उमेदवार आघाडीवर होते. अखेर सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. निकाल घोषित होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार असे….
अशोक तापडिया (1400), विजय संकलेचा (1386 ), श्रीनिवास लोया ( 1396 ), वसंतराव नगरकर (1371), विजय चोरडिया (1412), गोपी आलठक्कर (1354), नेमीचंद कोचर (1391), बसंत गुरुनानी (1341 ), सचिन घोडके (1361) सुरेश टरले (1329 ) डॉक्टर पूनमचंद ठोळे (1384), उमेश नगरकर (1380), गोरखनाथ बलकवडे (1297), मोहन लाहोटी (1390), तर अपक्ष उमेदवार जीवन घिया यांना फक्त (441) मते मिळाली. यामध्ये इतर मागासवर्ग गटातून पुरुषोत्तम फुलसुंदर, महिला गटातून आशा जाजू, राजश्री कपोते, भटक्या विमुक्त जाती-जमाती गटातून अंजली राठोड व अनुसूचित जाती-जमाती या गटातून दयानंद सदाफुले हे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news