पुढारी ऑनलाईन डेस्क : अवकाश (Space) आणि ब्रह्माण्डाविषयी (Universe) अशी अनेक रहस्ये अजूनही आहेत ज्यांबद्दल आपल्याला माहिती नाही. संशोधक आणि शास्त्रज्ञ सतत अनेक आश्चर्यकारक संशोधन करत असतात, ज्यामुळे आपण थक्क होतो. इतकेच नाही तर अनेक शास्त्रज्ज्ञ असे आहेत जे बाह्य अवकाशात वनस्पती वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात यशही मिळात आहे. अवकाशात भाजीपाला आणि बागा वाढवण्यात अनेक शास्त्रज्ञांना यश आले आहे. नुकतेच NASA ने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर उगवलेल्या फुलाचे एक आश्चर्यकारक चित्र शेअर केले आहे, जे अवकाशातील कुतुहल आणखी वाढवणारे आहे. (NASA Shares Picture Of Flower).
NASA ने स्पेस फ्लॉवरचे एक सुंदर चित्र पोस्ट केले आणि लिहिले "आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर व्हेजी सुविधेचा एक भाग म्हणून झिनिया (Zinnia) या फुलझाडाला वाढवले गेले. शास्त्रज्ज्ञ १९७० पासून अंतराळातील वनस्पतींचा अभ्यास करत आहेत, परंतु २०१५ मध्ये NASA अंतराळवीर केजेल लिंडग्रेन (Kjell Lindgren) यांनी ISS वर हा विशेष प्रयोग सुरू केला होता.
नासाने फुलाचे फोटो शेअरकरुन पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे, "आमचे स्पेस उद्यान केवळ दिखाव्यासाठी नाही. अंतराळ कक्षेत वनस्पती कशा वाढतात हे जाणून घेताना, पृथ्वीवरील पिके येथे कशी उगवता येतील हे समजून घेण्यास मदत होईल. जे चंद्र, मंगळ आणि त्यापुढील दीर्घ कालावधीच्या मोहिमांमध्ये ताज्या अन्नाचा एक मौल्यवान स्त्रोत प्रदान करेल. @NASAAstronauts ने ISS वर इतर भाज्यांसह कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारी पाने, टोमॅटो आणि मिरचीची लागवड केली आहे आणि बऱ्याच पिकांची लागवड करण्यात आली आहे. (NASA Shares Picture Of Flower)
NASA द्वारे शेअर केलेल्या स्पेसमधील झिनियाच्या फुलाला फिकट नारिंगी पाकळ्या पूर्ण फुललेल्या आहेत. त्याची गुंतलेली पाने चित्राच्या वरच्या डाव्या कोपऱ्यापर्यंत पसरलेली दिसतात. एकूणच, हे स्पेस फ्लॉवर खूप सुंदर दिसत असून ही आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे. लोकांना हे स्पेस फ्लॉवर खूप आवडते. नासाच्या या पोस्टला ५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
अधिक वाचा :