BTS Singer Jung kook: लाईव्ह सेशनमध्ये झोपी गेला K-Pop स्टार जुंगकूक, २१ मिनिटे पाहत राहिले फॅन्स | पुढारी

BTS Singer Jung kook: लाईव्ह सेशनमध्ये झोपी गेला K-Pop स्टार जुंगकूक, २१ मिनिटे पाहत राहिले फॅन्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरियन बँड BTS बद्दल जगभरात एक वेगळीच क्रेझ आहे. (BTS Singer Jung kook) सातही बीटीएस सदस्यांची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे. दरम्यान, बीटीएस गायक जुंगकूक चाहत्यांसाठी लाईव्ह आला आणि नंतर थेट झोपी गेला. दरम्यान ६० लाख चाहत्यांनी त्याला २१ मिनिटे झोपताना पाहिले. जंगकूक थेट लाईव्ह स्ट्रीमिंगमद्ये झोपला. या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही फॅन्सनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. (BTS Singer Jung kook)

रविवारी सकाळी जुंगकूकला झोप येत नव्हती, त्यावेळी त्याने आपल्या फॅन्ससोबत लाईव्ह सेशन करण्याचे ठरवले. लाखो फॅन्स जुंगकूकला पाहत होते. यावेळी त्याने काळा टीशर्ट घातला होता. यादरम्यान जुंगकूकने आपल्या फॅन्सना सांगितले की- “मी जर असा झोपलो तर कंपनी वेडी होईल.”

असे म्हणताच जुंगकूक लगेच झोपी गेला. गायक झोपी गेल्यानंतर, हेच लाईव्ह सुमारे २१ मिनिटे सुरु राहिले. ६० लाख फॅन्सनी बीटीएस सिंगरला झोपताना पाहिले. जुंगकूकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जुंगकूक ट्विटरवर ट्रेंडदेखील करू लागला.

जंगकूकच्या या गोंडस क्षणावर चाहते सोशल मीडियावर फॅन्स प्रतिक्रिया देत आहेत. एकाने सांगितले, “म्हणून आम्ही ६.६ मिलियन अक्षरशः जुंगकूकसोबत त्याच्या बेडरूममध्ये त्याच्या पलंगावर होतो. जुंगकूक आश्चर्यकारक आहे.” आणखी एकाने म्हटले- “कधी कधी घर एक व्यक्ती असते, तो नेहमीच माझा आवडता व्यक्ती असेल.”

Back to top button