Nagpur Flood : नागपूरमध्ये अतिवृष्टी; वृद्धेचा मृत्यू, १४ जनावरे दगावली

file photo
file photo
Published on
Updated on

नागपूर पुढारी वृत्तसेवा : नागपूर शहरात अतिवृष्टीमुळे महिलेचा मृत्यू झाला. मीराबाई पिल्ले (वय. ७०) (रा.महेश नगर) असे त्‍यांचे नाव आहे. दरम्‍यान, पुराच्‍या पाण्‍यात बुडून  १४ जनावरे दगावली आहेत. आज दुपारपर्यंत पुराच्‍या पाण्‍यात अडकलेल्‍या ३४९ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सकाळपासून पावसाने उघडीप दिल्‍याने  मदत कार्याला वेग आला आहे. अंबाझरी तलाव, नागनदी, पिवळी नदी व नाल्यांची पाणी पातळी देखील  कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. (Nagpur Flood)

संबंधित बातम्‍या :

Nagpur Flood : ३४९ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील सखल भागात हाहाकार माजला आहे. आज (दि.२३) दुपारपर्यंत पुराच्‍या पाण्‍यात अडकलेल्‍या ३४९ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सकाळपासून पावसाने उघडीप दिल्‍याने मदत कार्याला वेग आला आहे. नागपूरमध्‍ये 'एसडीआरएफ'च्या २ तुकड्या ७ गटात विभागण्यात आल्या आहेत. सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे. आतापर्यंत एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीमने ३४९ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. मूक-बधीर विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरू नका : देवेंद्र फडणवीस

बचाव कार्याचा विचार करता महापालिका अग्निशमन विभागातर्फे 152, एसडी आरएफ105, एनडीआरएफ टीम 45, कामठी येथील आर्मी टीम 36 तर आपदा मित्र टीमच्या वतीने 11अशा 349 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. आज सकाळी 10 पर्यंत 50.5 मिमी पाऊस झाला.सप्टेंबर महिन्यात एकंदर  253.6 मिमी 150.6 टक्के पाऊस झाला. महावेधने दिलेल्या माहितीनुसार नागपूर विमानतळ 111 मिमी, सीताबर्डी 111 मिमी, पारडी 103 मिमी अशी पावसाची नोंद झाली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. वृद्ध नागरिकांना सर्व ती मदत तातडीने द्या, असे निर्देश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन, पदाधिकारी यांना दिले आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news