संपादित जमिनीच्या पैशांवरून युवकाचा खुन; खेड तालुक्यातील निमगाव येथील घटना

संपादित जमिनीच्या पैशांवरून युवकाचा खुन; खेड तालुक्यातील निमगाव येथील घटना

राजगुरूनगर, पुढारी वृत्तसेवा: रेल्वेसाठी गेलेल्या आईच्या हिश्याचे शेतजमिनीचे पैसे मागत असल्याच्या कारणावरुन २५ वर्षीय युवकाचा दगडाने व स्टील रॉडने मारून खुन झाल्याची घटना निमगाव (ता. खेड) येथे घडली. अशोक बाळू भालेराव (रा. कवळा ठाकरवाडी, निमगाव, ता. खेड) असे खुन झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल झाला असून दत्ता बाळू भालेराव यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शांताराम दगडू शिंदे, विशाल शांताराम शिंदे, सुनिल शांताराम शिंदे व सुभाष काळे (रा. रेटवडी, ता खेड) अशी संशयित आरोपीची नावे आहेत. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत अशोकचे मामा शांताराम दगडू शिंदे, संपत दगडू शिंदे, मावशी मनिषा काळे व मयताची आई कमल भालेराव असे चौघाच्या नावे माळेगाव (ता. खेड) येथे दहा ते बारा एकर शेती आहे. त्यापैकी काही क्षेत्र रेल्वे व रस्त्याच्या कामासाठी शासनाने घेतले आहे. त्याचे ५० लाख रूपये मामाकडे आले.

त्यापैकी संपत शिंदे यांना २० लाख, मनिषा काळे यांना ५ लाख रूपये दिल्याचे मयत अशोक व घरातील लोकांना समजले होते. मयताच्या आईला एकही रूपया दिला नाही. त्याबाबत काही दिवसांपुर्वी मामाकडे शेतीचे पैसे मागण्यासाठी गेले असता त्यांना मामा शांताराम शिंदे व त्यांच्या मुलांनी मारहाण केली होती. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान पैशावरुन झालेली भांडणे मिटवण्यासाठी ११ जून ला संध्याकाळी मयत अशोक, भाऊ अविनाश भालेकर व मामाचा मुलगा सुनिल शिंदे निमगाव येथील कंपनीसमोर आले होते.

तिघांनी मोठ्याच्या भांडणात आपण लहानांनी पडू नये यावर चर्चा केली होती. त्यानंतर मयत अशोक हा सुनिल शिंदे यास खेड सिटीच्या कमानीपर्यंत सोडवून येतो असे सांगून त्याच्यासोबत निघून गेला. शांताराम शिंदे, सुनिल शिंदे, विशाल शिंदे व सुभाष काळे यांनी शेतजमिनीचे पैसे मागत असल्याच्या कारणावरून धामणटेक येथे अशोक भालेकर याला गाठले. त्याच्या कपाळावर, तोंडावर, डोक्याच्या मागील बाजूस स्टील रॉडने व दगडाने मारून खून केला असल्याचे मयताचा भाऊ दत्ता भालेकर याने फिर्यादीत नमुद केले आहे. या घटनेचा पोलिस तपास करित असून संशयित फरार आरोपीचा शोध घेत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news