Mughlai Egg : अंडी खाण्याची आवड आहे तर चरचरीत मुगलाई अंड्याची रेसिपी करून बघाच

Mughlai Egg : अंडी खाण्याची आवड आहे तर चरचरीत मुगलाई अंड्याची रेसिपी करून बघाच
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : संडे हो या मंडे हे आपण फार पुर्वीपासून ऐकत आलो आहोत. अंडी खाण्यासाठी कोणतीही वेळ आपल्याला चालत असतो सकाळी नाष्टा करताना, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणावेळी आपण अंडी खातोच. यापुर्वी तुम्ही अंड्याचे विविध प्रकार केले असतील आणि खाल्लीही असेल पण तुम्हाला मोगलाई अंड्याची (Mughlai Egg) करी कशी करतात हे माहिती आहे का? मोगलाई अंड्याची (Mughlai Egg) करी क्रिस्पी, आणि स्पाईसी करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. जाणून घ्या.

तुम्ही किती लोक अंडी खाणार आहात यावर अंडी घ्यावी लागतील. त्यानंतर अंडी उकडून घ्या. एका भांड्यात तेल, लवंगा, तमालपत्र, वेलची, आले लसूण पेस्ट आणि कांदा घालून एकत्र मिश्रण करून गरम करावे. यात कांदा घालून लाल होईपर्यंत चांगला भाजावा.

याचबरोबर अंडा मसाला टोमॅटो पेस्ट घाला आणि तेल वेगळे होईपर्यंत शिजवा. पूर्ण झाल्यावर आले लसून पेस्ट घाला. तुम्हाला अजुन क्रिस्पी पाहिजे असेल तर काजू पेस्टही घालू शकता. काही वेळ हे सगळे मिश्रण शिजू द्या.

दरम्यान तुमच्या चविनुसार चटणी आणि मीठ टाकून घ्या.

मुगलाई अंड्याची रेसिपी पद्धत

दरम्यान पातळ ग्रेवी करण्यासाठी गरम पाण्याची आवश्यकता असते तुम्ही कीती लोक खाणार आहात त्या प्रमाणात पाणी गरम करून तयार झालेल्या मिश्रणात टाकून घ्या. यानंतर उकडलेल्या अंड्याचे अनावश्यक भाग काढून दोन किंवा चार भागात कापून ग्रेव्हीमध्ये टाका. टाकल्यानंतर तुम्ही काही वेळ सगळे मिश्रण हलवून एकजूट करा आणि मंद वाफेवर शिजवत ठेवा.

मुगलाई अंडी रेसिपी ही एक अनोखी डिश आहे जी आपल्या अंड्याच्या करीच्या यादीमध्ये समाविष्ट होते.

साधी घरगुती मसाले वापरून ही सोपी डिश तयार केली जाते. लाच्छा पराठा, नान सोबत आपण याचा आस्वाद घेऊ शकतो! जेव्हा तुम्ही सुट्टीच्या दिवशी मस्त जेवण करणार असाल किंवा घरी पाहुणे आले असतील तेव्हा ही डिश बनवा.

४ अंडी, १ कप टोमॅटो पेस्ट, २ टेबलस्पून आले लसून पेस्ट, 2 टीस्पून काजू पेस्ट, १ मध्यम कांदा, १ टीस्पून लाल मिरची पावडर, १ टीस्पून धनिया पाउडर, आरदा टीस्पून हळद पावडर चवीनुसार मीठ.

मुगलाई अंडी बनवन्याच्या टिप्स

१) ४ अंडी उकडून घ्या

२) एक भांडे, तेल, लवंगा, तमालपत्र, वेलची, आले लसूण पेस्ट आणि कांदा घाला.

३) चिरलेला कांद लाल होऊपर्यंत हलवत रहा.

४) टोमॅटो पेस्ट व इतर मसाला टाकून तेल वेगळे होईपर्यंत शिजवा. हवी असेल तर काजू पेस्टही टाकू शकता.

५) उकडलेली अंडी त्यांचे दोन भाग करा आणि तयार ग्रेव्हीमध्ये घाला. तुमची डीश तयार असेल, डिश सजवण्यासाठी कोथिंबीर घालून सजवू शकता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news