![MS Dhoni](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F10%2FCopy-of-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट विश्वातील ख्यातनाम मासिक ओळख असणार्या 'विस्डेन'ने भारताचा ऑलटाईम फेवरेट टी-२० संघ बनवला आहे. ऑस्ट्रेलियात विश्वचषक खेळण्यासाठी गेलेल्या संघातील ७ खेळाडूंचा विस्डेनच्या यादीत समावेश आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे भारताला पहिला आणि एकमेव टी-२० विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार एम.एस. धोनीला (MS Dhoni) संघात स्थान देण्यात आलेले नाही. तर, दिनेश कार्तिकला यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.
मंगळवारी रात्री विस्डेन ऑलटाईम फेवरेट इंडियन टी-२० संघाची घोषणा केली. कोणत्याही मानकांनुसार संघ निवडणे सोपे नसते. क्रिकेटमध्ये सर्वत्र स्पर्धा आहे. टी-२० फॉरमॅटच्या सुरुवातीच्या काळातील खेळाडूंची आजच्या खेळाडूंशी तुलना करणे सोपे नाही. असे संघाची घोषणा करताना विस्डेन मासिकाने म्हटले आहे. (MS Dhoni)
विस्डेनच्या ऑल टाइम टी-२० फेवरेट संघामध्ये समाविष्ट केलेल्या १२ खेळाडूंपैकी ७ खेळाडू ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियात सहभागी आहेत, तर ४ खेळाडूंची २००७ च्या विजयी संघातून निवड करण्यात आली आहे. सध्याच्या विश्वचषक संघाबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आर अश्विन, भुवनेश्वर कुमार यांची नावे आहेत, तर २००७ चा विश्वविजेता युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांनी संघात स्थान मिळवले आहे
विस्डेन मासिकाने धोनीला संघात स्थान न दिल्याबद्दल विश्लेषण केले आहे. 'टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या कर्णधार धोनीला बाहेर ठेवणे सोपे नव्हते.' धोनीला संघात स्थान न देण्यापाठीमागे विस्डन ही चार कारणे दिली आहेत.
रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, युवराज सिंग, हार्दिक पंड्या, सुरेश रैना, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा, वीरेंद्र सेहवाग.
हेही वाचा;