Motorola चा स्लीम स्मार्टफोन होतोय लवकरच लॉन्च

Motorola Edge 30
Motorola Edge 30

पुढारी ऑनलाईन डेस्क : नोवोची मालकी असलेली Motorola Edge 30 हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात लॉन्च होत आहे. कंपनी आपला एज सीरिजचा नवीन मोबाईल फोन शुक्रवारी (दि.12) हा लॉन्च करणार आहे. मोटोरोला कंपणीने म्हटले आहे की, हा जगातील सर्वात पातळ आणि सर्वात हलका 5G स्मार्टफोन असेल. तसेच, हा भारतातील पहिला Snapdragon 778G Plus आणि 5G प्रोसेसरचा (Snapdragon 778G + 5G प्रोसेसर) स्मार्टफोन असणार आहे. Motorola Edge 30 हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट या प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Motorola Edge 30 हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात जागतिक स्तरावर लॉन्च झाला होता. Snapdragon 8G आणि 1 प्रोसेसर असलेल्या या फोनची किंमत 44,999 रुपये आहे. भारतीय बाजारपेठेत याची किंमत 36,000 रूपये इतकी असणार आहे.

Motorola Edge 30
Motorola Edge 30

Motorola Edge 30 चे फीचर्स

हा स्मार्टफोन 144Hz रिफ्रेश रेट, 256 GB स्टोरेज, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 4,020mAh बॅटरीसह POLED देतोय.  Motorola Edge 30 या स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा पोल्ड डिस्प्ले आहे. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2400×1080 पिक्सेल असून फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज उपलब्ध आहे.

50-50 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे असतील. सोबत 2 मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटमध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, WiFi 6E, ब्लूटूथ 5.2, GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट सारखे फीचर्स दिले आहे.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news