Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रा; आतापर्यंत ३ लाखांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन; गेल्या काही वर्षातील सर्वाधिक संख्या

Amarnath Yatra 2024
Amarnath Yatra 2024

पुढारी ऑनलाइन डेस्क : अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पुढची तुकडी जम्मू येथून रवाना झाली. यावर्षी या पवित्र गुहेची यात्रा करणाऱ्या भाविकांची संख्या तीन लाखांच्या पुढे जाऊन ३,०७, ३५४ वर पोहोचली आहे. १ जुलैपासून सुरू झालेली बाबा अमरनाथ यात्रा यावेळी ६२ दिवसांची आहे. आज सकाळी या यात्रेसाठी आणखी एक तुकडी रवाना झाली आहे. यावेळी बसमधील यात्रेकरूंनी बाबा अमरनाथ की जय, भोले बाबा की जय, भगवान भोलेनाथ की जय, असा जयघोष केला. (Amarnath Yatra 2023)

Amarnath Yatra 2023 : गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक भाविक 

अमरनाथ यात्रा करणार्‍या भाविकांची संख्या ३,०७, ३५४ पर्यंत वाढली असून, केवळ २१ दिवसांत तीन लाखांचा आकडा पार केला आहे. जो गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. १ जुलैपासून सुरू झालेली बाबा अमरनाथ यात्रा यावेळी ६२ दिवसांची आहे. अमरनाथ यात्रेची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "सरकारने वीज, आरोग्य, रस्ते, स्वच्छता आणि रस्ते वाहतूक, हेलिपॅड सेवा, वाहतूक सेवा आणि इतर सर्व सेवांच्या भौतिक पायाभूत सुविधांचा योग्य विकास केला आहे.

यात्रेकरूंना सुमारे 30 शासकीय विभागांचा यावेळी समावेश करण्यात आला आहे. निवास, भोजन, पाणी आरोग्य, काळजी यासारख्या सुधारित सुविधांमुळे या वर्षी यात्रेला येणाऱ्या भाविकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आज सकाळी आणखी एक तुकडी अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाली आहे. याचा व्हिडिओ एएनआय वृत्तसंस्थेने शेअर केला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news