पंधरा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; 19 ते 21 जूनदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा

file photo
file photo

पुणे : पुढारी वृत्तसेवा: राज्यातील जूनचा पहिला पंधरवडा मान्सूनसाठी फारसा पोषक नव्हता. मात्र, 19 ते 21 जून या कालावधीत तो वेग घेणार असून, राज्यातील 15 जिल्ह्यांना हवामान विभागाने 'यलो अलर्ट'चा इशारा दिला आहे. दरम्यान, राज्यातील विदर्भासह गुजरात, मध्य प्रदेशमध्ये मान्सून पोहोचला आहे.

यंदा मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र राज्य व्यापले असले, तरीही कमी दाबाचे पट्टे तयार होत नसल्याने बाष्पयुक्त ढगांच्या निर्मितीस खूप वेळ लागत आहे. त्यामुळे मान्सून राज्यात पाऊस पाडण्यात अपयशी ठरतो आहे. मात्र, 19 जूनपासून परिस्थितीत किंचित बदल होत असून, पंधरा जिल्ह्यांना मुसळधारेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राच्या विदर्भातून शुक्रवारी मान्सूनने गुजरात राज्यात प्रवेश केला.

ऑरेंज अलर्ट

– रत्नागिरी : 20 ते 21 जून
– सिंधुदुर्ग : 18 ते 21 जून
– यलो अलर्ट : 19 ते 21 जून
– पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.

राज्यातील पाऊस (मिमीमध्ये)

कोकण : वैभववाडी-50, खालापूर-40, वालपोई-30, कणकवली-30, सावंतवाडी-30, रत्नागिरी-20, ठाणे-10
विदर्भ : अकोला-90, खामगाव-50, चिखली-40, बाळापूर-30, तेल्हारा-20, धामणगाव रेल्वे-20, नांदुरा-10,
मराठवाडा : उदगीर-40, जळकोट-40, सोनपेठ-40, वडवणी-30, अहमदपूर-20, मानवत-20, परळी वैजनाथ-20, सेलू-10,
मध्य महाराष्ट्र : खाकरी-20, महाबळेश्वर-20 गुजरखेडा-20
घाटमाथा : लोणावळा, खोपोली, अंबोणे- 10
मान्सूनची प्रगती झाल्याचा हवामान विभागाचा दावा
विदर्भ, गुजरात, मध्य प्रदेशात प्रगती

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news