जाडरबोबलाद येथे चोरी; मुद्देमाल लंपास | पुढारी

जाडरबोबलाद येथे चोरी; मुद्देमाल लंपास

जत; पुढारी वृत्तसेवा : जाडरबोबलाद (ता. जत) येथे घरात कोणी नसल्याचे पाहून भरदिवसा चोरट्यांनी कुलूप तोडून 1 लाख दहा हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. याबाबत बसवराज ईश्वराप्पा आवटी यांनी उमदी पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी, जाडरबोबलाद येथील आवटी यांचे घर रानात आहे. शुक्रवारी दुपारी आवटी यांच्या घरात कोणीही नव्हते. यावेळी चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरातील 88 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख 22 हजार रुपये असे एकूण 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

Back to top button