MLA Ashish Shelar : “जळजळतय, मळमळतय मग, घ्या ना…” : आशिष शेलारांचा शिवसेनेला टाेला

 MLA Ashish Shelar
MLA Ashish Shelar

पुढारी ऑनलाईन टेस्क : शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईत उत्सवाची धूम सुरु आहे. हे पाहून पोटात मळमळ होतेय, मुरड मारताेय म्हणून ते सामनातून जळजळ व्यक्त करत आहेत. ज्यांना मराठी माणसाचे उत्सव आणि आनंद बघून मळमळ, जळजळ होतेय, त्यांना आमचा एकच सल्ला "मग घ्या ना धौती योग!" असा खोचक टोला भाजपा नेते आशिष शेलार ( MLA Ashish Shelar) यांनी शिवसेनेला ट्विट करत मारला आहे.

गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमयरीत्या वळण मिळत गेले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आज सकाळी भाजप नेते आशिष शेलार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत " …मग घ्या ना धौती योग!आमची सच्चाई रोखठोक…" असं लिहीत त्यांनी एक फोटो शेअर केला आहे.

 MLA Ashish Shelar : आशिष शेलार यांनी लिहलेले आहे तसं

यामध्ये त्यांनी लिहले आहे की, ज्यांनी राम वर्गणीची खिल्ली उडवली. ज्यांनी अडीच वर्षे मंदिरात देवाला बंदिवान केले. ज्यांनी दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव बंद करायला लावले त्यांना आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईत उत्सवाची धूम सुरु आहे. हे पाहून पोटात मळमळ होतेय, मुरड मारतेय म्हणून ते सामनातून जळजळ व्यक्त करत आहेत. ज्यांना मराठी माणसाचे उत्सव आणि आनंद बघून मळमळ, जळजळ होतेय, त्यांना आमचा एकच सल्ला "मग घ्या ना धौती योग!"
भाजप दरवर्षीच दहिहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव साजरा करीत आहे. आम्ही महाराष्ट्रातील माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होत आहोत. त्याचे कधीच राजकारण केले नाही. कोरोना, वादळ, अतिवृष्टी अशा प्रत्येक संकटात भाजपाचे नेते, पदाधिकारी, मंत्री, कार्यकर्ते अडचणीच्या काळात घरात बसून राहिले नाहीत, घरोघरी जाऊन मदत करीत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आमच्यावर आहे. त्यामुळे आम्ही कधीच जे केले त्याचे "करुन दाखवले" असे होर्डिंग लावले नाहीत.

 MLA Ashish Shelar : ज्यांना राजकीय जळजळ होतेय…

पण जेव्हा आम्ही म्हणजेच उत्सव अशा थापा मारणाऱ्यांकडे आता "थापा" पण राहिला नाही आणि उत्सवही … यावेळी आम्ही  उत्सवाची केवळ मुंबईतील आकडेवारी देऊन गर्वहरण केले. त्यावेळी मात्र जळजळ व्हायला लागली. गिरणगावात म्हणजे लालबाग, परळ, शिवडीमध्ये मराठी दांडिया भाजपाने आयोजित केला त्याचा त्रास सामनाकारांना आणि पेग्विंन सेनेला एवढा का झाला? अर्थात याकूबच्या कबरीचे सुशोभीकरण करणाऱ्यांना मराठी दांडियाचा त्रास होणारच! अहंकार,गर्व हरण करणाऱ्या दुर्गेचा, शारदेचा, अंबेचा हा उत्सव आहे. या उत्सवात ज्यांना राजकीय जळजळ होतेय, राजकीय वाद काढून क्लेश करुन तुझ्या भक्तांच्या आनंदात विरजण घालत आहेत, असेही शेलार यांनी म्‍हटलं आहे.  

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news