पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेनने (DRDO) मिशन दिव्यास्त्र यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. या मिशनमध्ये Multiple Independently Targetable Re-entry Vehicleची अग्नी ५ क्षेपणास्त्राद्वारे यशस्वी चाचणी घेण्यात आली. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी DRDOच्या टीमचे कौतुक केले आहे. "अग्नी ५ हे क्षेपणास्त्र आणि Multiple Independently Targetable Re-entry Vehicle हे तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी बनवाटीचे आहे. या यशाबद्दल मला DRDOच्या टीमचा मला अभिमान वाटतो." (Mission Divyastra)
या तंत्रज्ञानामुळे भारताची संरक्षण सिद्धता कित्येक पटीने वाढलेली आहे. या तंत्रज्ञानामुळे एकाच क्षेपणास्त्रात एकापेक्षा अधिक शस्त्र बसवता येतात आणि ती वेगवेगळ्या टार्गेटवर डागता येतात. म्हणजे एकाच मिशनमधून शत्रूंची विविध टार्गेट अग्नी ५च्या टप्प्यात आलेली आहेत. जगातील फक्त काही देशांकडेच हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. टार्गेटवर अतिशय नेमकेपणाने हा हल्ला केला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे भारतीच्या संशोधन क्षमतेवर पुन्हा एकदा शिक्कमोर्तब झाला आहे.
हेही वाचा