स्वदेशी बनावटीच्या जहाजभेदी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

स्वदेशी बनावटीच्या जहाजभेदी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या जहाजभेदी क्षेपणास्त्राची नुकतीच यशस्वी चाचणी घेतली. या संदर्भातील एक व्हिडीओ जारी करीत नौदलाने या कामगिरीची माहिती दिली आहे.

नौदलासाठी डीआरडीओने हे क्षेपणास्त्र व त्या अनुषंगिक यंत्रणांची निर्मिती केली आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी नुकतीच घेण्यात आली. त्यात सी किंग 42 बी या नौदलाच्या लढाऊ हेलिकॉप्टरमधून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. प्रचंड गतीने आपल्या निर्धारित लक्ष्यापर्यंत जात या क्षेपणास्त्राने टार्गेेटचा वेध घेण्यात यश मिळवले. ही चाचणी कधी व कोठे घेण्यात आली हे नौदलाने जाहीर केलेले नाही. केवळ क्षेपणास्त्रच नव्हे तर त्या अनुषंगाने लागणार्‍या यंत्रणाही डीआरडीओने विकसित केल्या आहेत. त्यात मुख्य क्षेपणास्त्र, टार्गेट सेन्सर, दिशादर्शक यंत्रणा यांचा समावेश आहे. तसेच हेलिकॉप्टर, विमान आणि जहाज अशा तिन्ही माध्यमांतून सोडता येणार्‍या या क्षेपणास्त्रासाठी तीन स्वतंत्र यंत्रणा डीआरडीओने विकसित केल्या आहेत. ही सर्व निर्मिती पूर्णपणे भारतात करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news