Mehmood Birth Anniversary : महमूद यांनी राजेश खन्नांना का लगावली होती कानशिलात?

mehmood-rajesh khanna
mehmood-rajesh khanna
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मोठ्या पडद्यावर खळखळून हसवणारे दिवंगत अभिनेते मुळात रागीट स्वभावाचे होते. त्यांचा आणि काका राजेश खन्ना यांचा सेटवरील एक किस्सा सांगितला जातो. एका प्रसिद्ध चित्रपटाच्या शूटिंगवेळी सर्वांसमोर घडलेला हा किस्सा आहे. (Mehmood Birth Anniversary )'पडोसन'मध्‍ये चमनगोटा करून मद्रासी सोंग काढून 'एक चतुर नार…' गाऊन प्रेक्षकांना पोटभर हसायला लावणारा, 'शाबास डॅडी'मध्‍ये मराठी बोलणारा, 'मुथ्‍थु कुडी…' आणि 'हम काले है तो क्‍या हुआ दिलवाले हैं' यासारख्या गाण्यांनी प्रेक्षकांच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवणारा महमूद यांचा २९ सप्टेंबरला जन्मदिवस. (Mehmood Birth Anniversary )

'मुथ्‍थु कुडी गाणं आजही मनावर रुंजी घालणारे

'छोटी बहन'मध्‍ये महमूद यांच्‍यातला विनोदी गुण सर्वांसमोर आला. जशी महमूद यांची लोकप्रियता वाढली, भलेभले नायक मागे पडले. 'दिल तेरा दिवाना'मध्‍ये हैदराबादी हेल काढले. 'पडोसन'मध्‍ये चमनगोटा करून मद्रासी सोंग काढून प्रेक्षकांना हसायला लावलं. 'शाबास डॅडी'मध्ये मराठी बोलले. 'पूर्णिमा'मध्‍ये त्‍यांनी खुद्‍द गायले. त्‍यांच्‍या 'मुथ्‍थु कुडी' हे गाणं आजही संगीतरसिकांच्‍या ओठांवर रुळलेलं आहे. 'हम काले है तो क्‍या हुआ दिलवाले हैं'ने प्रेक्षकांच्‍या मनावर अधिराज्‍य केलं. 'हम काले है तो क्‍या हुआ दिलवाले हैं' हे गाणं महम्‍मद रफी यांनी गायलं होतं आणि त्‍याहीपेक्षा जास्‍त सुरुवातीचं महमूद यांनी म्‍हटलेलं, 'खयालोंमें खयालोंमें' हे सिनेरसिकांच्‍या पसंतीस उतरलं होतं.

विनोदी अभिनेता पण स्वभावाने रागीट

बॉलिवूड चित्रपटांना नवी दिशा देणारे प्रसिध्‍द विनोदी अभिनेते महमूद यांनी 'भूत बंगला', 'पडोसन', 'बॉम्बे टू गोवा', 'गुमनाम', 'कुंवारा बाप' यासारख्या एकापेक्षा एक चित्रपटांत काम केलं. महमूद विनोदी अभिनेते असले तरी पडद्यामागे स्वभावाने थोडेसे रागीट होते.
महमूद यांच्या रागीट स्वभावाचा एक किस्सा सांगितला जातो. एक दिवस त्‍यांनी सुपरस्टार राजेश खन्ना यांना सर्वांसमोर कानशिलात लगावली होती. ते वर्ष होतं १९७९ चं. महमूद यांनी आपला चित्रपट 'जनता हवलदार'साठी राजेश खन्ना यांना साईन केलं होतं. राजेश खन्ना यांचं त्‍यावेळी एक वेगळचं स्टारडम होतं. महमूद आपल्या फार्महाऊसमध्‍ये चित्रपटाचे शूटिंग करत होते.

काय होता तो किस्सा?

एकेदिवशी सेटवर महमूद यांच्‍या मुलाने राजेश खन्ना यांना पाहिलं आणि राजेश यांना केवळ 'हॅलो' म्‍हटलं. नंतर तो निघून गेला. या गोष्‍टीमुळे राजेश खन्ना नाराज झाले. या घटनेनंतर राजेश नेहमी सेटवर उशीरा येऊ लागले. महमूद यांना राजेश खन्ना यांची तासनतास सेटवर प्रतीक्षा करावी लागायचीय मुख्य नायक असलेल्या चित्रपटाचे दिग्‍दर्शनमहमूद करत होते. एक दिवस वेळेवरून राजेश खन्ना आणि महमूद यांच्‍यामध्‍ये वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, महमूद यांनी सर्वांसमोर राजेश यांच्या कानशिलात लगावली.

काय म्हणाले होते महमूद?

महमूद राजेश यांना म्‍हणाले होते की, 'आपण सुपरस्टार असाल, तुमच्‍या घरात…मी तुम्‍हाला या चित्रपटासाठी पूर्ण पैसे दिले आहेत. त्‍यामुळे वेळेवर हा चित्रपट पूर्ण करायला हवा.'

‍या प्रसंगानंतर राजेश खन्ना सेटवर वेळेत येऊ लागले. चित्रपटाचे शूटिंगही वेळेत पूर्ण झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news