Neha Khan : नेहा खानचा ऑफ शोल्डर वेस्टर्न हॉट लूक, नेटकरी म्हणाले… | पुढारी

Neha Khan : नेहा खानचा ऑफ शोल्डर वेस्टर्न हॉट लूक, नेटकरी म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिकारी या चित्रपटातून लोकप्रिय झालेली नेहा खानने हॉट अवतार दाखवला आहे. नेहाने काही दिवसांपूर्वी परदेशवारी केलीय. लंडन येथे ती गेल्याचे समजते. लंडनमधील काही निवडक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Neha Khan) ऑफ शोल्डर डेनिम मिनी शॉर्ट पीस तिने परिधान केला आहे. ब्लॅक कलरचे हाय हिल्स बूट तिने परिधान केला होता. एका हातात घड्याळ, इअरिंग्ज आणि मोकळे केस असा लूक तिने पूर्ण केलाय. (Neha Khan)

नेहाने चित्रपटांसोबतच टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. तिने देवमाणूस या गाजलेल्या मालिकेत काम केलं. यामध्ये ती पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होती. एसीपी दिव्या सिंह हे तिचे पात्र लोकप्रिय ठरले. द डार्क साईड ऑफ लाईफ: मुंबई सिटी, शिकारी, फ्रेंडशिप बँड, युद्ध भूमी आणि 1971: बियॉन्ड बॉर्डर्समध्येही तिने काम केले. नेहा खान का जन्म १३ ऑगस्ट, १९९५ रोजी अमरावती येथे झाला. शालेय शिक्षण राजेश्वरी विद्यामंदिर, अमरावती येथे पूर्ण केले. तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले.

वयाच्या १५ व्या वर्षी तिने राजकुमारीचा किताब जिंकला. २०१६ मध्ये तिने सनी देओलच्या घायल : वन्स अगेनमध्ये भूमिका साकारली होती. तिने अनुपम खेर यांच्या ॲक्टर्स प्रिपेयर्स या ॲक्टिंग स्कूलमध्ये अभिनयाचे धडे घेतले आहेत. हिंदी चित्रपटांशिवाय तिने मराठी आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

नेटकरी काय म्हणाले-

अनेक नेटकऱ्यांनी तिला फायर आणि हार्ट इमोजी कॉमेंट्स केले आहेत. काहींनी तिला स्टनिंग, सुंदर, गॉर्जियस, लूकिंग हॉट, ब्युटिफुल आणि सौन्दर्याचा .. अप्रतिम नमुना खूपच छान दिसतेस 😍👌 अशा कॉमेंट्स दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Khan (@nehakhanofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Khan (@nehakhanofficial)

Back to top button