Hardeek Joshi : हार्दिक जोशींचा नवा चित्रपट “क्लब 52” येतोय भेटीला | पुढारी

Hardeek Joshi : हार्दिक जोशींचा नवा चित्रपट "क्लब 52" येतोय भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : दमदार स्टारकास्ट असलेल्या “क्लब 52” या चित्रपटाचे टीजर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. नाथ प्रॉडक्शन्सची प्रस्तुती आणि निर्मिति असलेल्या वैशाली ठाकुर निर्मित “क्लब 52” १५ डिसेंबरला रिलीज होतोय. (Hardeek Joshi) अमित कोळी दिग्दर्शित या चित्रपटाची कथा बजरंग बादशाह यांची असून राकेश शिर्के यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. (Hardeek Joshi)

कौशल गोस्वामी यांनी छायांकन, करण आणि दर्शन यांनी संगीत, अजय वाघमारे, बजरंग बादशाह, सुजाता पवार यांनी गीतलेखन, आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात अभिनेता हार्दिक जोशी, भरत ठाकूर, भाऊ कदम, शशांक शेंडे, यशश्री दसरी, टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके, संदीप गायकवाड अशी तगडी स्टारकास्ट आहे. महेश गायकवाड यांचे सहकार्य आणि मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

‘एक डाव नियतीचा’ अशी टॅगलाईन असलेल्या “क्लब 52” या चित्रपटाचं नाव मॉडर्न आणि आकर्षक आहे. मात्र नावावरून चित्रपटाच्या कथेचा काहीच अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे आता चित्रपटाविषयी अधिक उत्सुकता वाढली आहे.

Back to top button