Me Vasantrao Movie : मी वसंतराव चित्रपटाचा होणार वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

mi vasantrao
mi vasantrao

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपट 'मी वसंतराव' लवकरच डिजिटल माध्यमावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Me Vasantrao Movie) गेल्या वर्षी अनेक फिल्म महोत्सव तसेच भारतीय सिनेमागृहात प्रदर्शित होताच देशभरातून समीक्षकांची दाद मिळालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून ही सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. एवढेच नव्हे तर प्रेक्षक OTT वर हा सिनेमा कधी बघायला मिळेल याची आतुरतेने वाट पाहत होते, आणि आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. २१ मे रोजी या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. (Me Vasantrao Movie)

दोन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर ही उत्सुकता निर्माण केली होती. ९५ व्या ऑस्करसाठी जगभरातील ३०१ चित्रपटांची रिमांईंडर लिस्ट जाहीर केली होती यांमध्ये 'मी वसंतराव' चा समावेश होता.

राहुल देशपांडे म्हणाले-'मी वसंतराव' हा चित्रपट एक वेगळाच प्रयोग होता. यामध्ये माझे आजोबा डॉ. वसंतराव देशपांडे यांचीच कथा मी त्यांचा नातू, एक नट म्हणून रसिकांसमोर घेऊन आलो. त्यातील गाणी आणि संगीत दिग्दर्शन हे देखील मी स्वत:च केले असल्याने हा चित्रपट अनेकार्थाने माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आम्ही केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली याच्यासाठी मी आभारी आहे. आणि आता आमच्या चित्रपटाचा डिजिटल वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. त्यामुळे आमची ही कलाकृती जगभरातील सगळे प्रेक्षक बघू शकतील याचा मला खूप आनंद होतोय आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news