Pallavi Patil
Pallavi Patil

छोट्या पडद्यावर अभिनेत्री पल्लवी पाटील हीच पदार्पण

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री पल्लवी पाटील हिने मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारून तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. छोट्या वाहिनीवरील नवीन मलिका नवा गडी नवं राज्य प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो टीव्ही वाहिनीवर सादर करण्यात आला. या मालिकेद्वारे पल्लवी पाटील पहिल्यंदा छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.

पल्लवी पाटील हिचं पात्र गावातून आलेल्या एका मुलीचा आहे. आपल्या आई-वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांची शिदोरी घेऊन आलेली मुलगी रामाचा अर्धा राहिलेला संसार पूर्वपदावर आणण्याचा कसोशीने प्रयत्न करते. तिच्या बाळाची आई होताना जणू प्रसव वेदना सहन करते आणि सासू हीच आपली आई आहे या विचाराने सासूला आपलंसं करण्याचा चंग बांधते.

या मालिकेत पल्लवी पाटील आनंदीच्या भूमिकेत दिसणार आहे. अनिता दाते रमाच्या भूमिकेत व रमाच्या मुलीच्या भूमिकेत सायशा भोईर दिसणार आहे. अभिनेता कश्यप परुळेकर देखील या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसेल. छोट्या पडद्यावरचा हा पहिला प्रवास पल्लवी साठी खूप मोठी संधी घेऊन येत आहे आणि आनंदीच पत्र निभवायला ती खूप उत्साहित आहे.

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना पल्लवी म्हणाली, "मराठी चित्रपटात खूप शिकायला मिळालं आणि आता मला एक नवीन संधी मिळाली आहे. आनंदी हे पात्र रामाचा अर्धा राहिलेला संसार पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करते आणि सगळे आव्हान स्वीकारते. आनंदीचं पात्र निभवताना मला खूप आनंद होत आहे आणि प्रेक्षकांना पण आनंदीच पात्र आवडेल अशी अपेक्षा करते."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news