आंबेगावात घरोघरी सर्दी, तापाचे रुग्ण | पुढारी

आंबेगावात घरोघरी सर्दी, तापाचे रुग्ण

मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यात कधी ऊन, कधी पाऊस, अशा सतत वातावरणात होणार्‍या बदलामुळे घरोघरी सर्दी, खोकला आणि ताप आदी लक्षणे आढळणारे रुग्ण दिसू लागले आहेत. कोरोनाही पाय पसरू लागला आहे. आपल्याला कोरोना तर झाला नाही ना? या धास्तीत लोक आहेत.

औषधांच्या दुकानात सर्दी, खोकल्याची औषधे घेणारे लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत. आंबेगाव तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातही ‘व्हायरल फीव्हर’चा जोर असल्याने गावागावांत सर्दी-तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. उपचारांसाठी रुग्णालयांत गर्दी वाढली आहे. ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंतची रुग्णालये हाऊसफुल्ल असल्याचे चित्र दिसत आहे. सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असून, यापासून काळजी घेण्याची गरज आहे. मागील आठवडाभरापासून रिमझिम पाऊस पडत आहे.

Back to top button